नांदेड : महसूल सेविकेचा सुनेनेच केला खून, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने काटा काढला
Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात ही घटना घडली. विशेष म्हणजे झोपेत असताना सुनेने आणि तिच्या प्रियकराने स्कार्पने सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर भावाचा मदतीने मृतदेह शहराबाहेर फेकून दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने या हत्या प्रकरणाचा छडा लावला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेड : महसूल सेविकेचा सुनेनेच केला खून
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने काटा काढला
Nanded Crime News, कुवरचंद मंडले : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या सासूचा सुनेने प्रियकराच्या मदतीने खून केलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात ही घटना घडली. विशेष म्हणजे झोपेत असताना सुनेने आणि तिच्या प्रियकराने स्कार्पने सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर भावाचा मदतीने मृतदेह शहराबाहेर फेकून दिला. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने या हत्या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी सुनेसह आठ वर्षांनी छोटा असलेला प्रियकर आणि अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. कमलाबाई क्षीरसागर (वय 54) अस हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा : सूड उगवला, महिलेने एक्सच्या पत्नीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचवलं, कसा रचला कट? पीडितेचं काय झालं?
स्कार्फने गळा आवळून संपवलं, भावाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट
अधिकची माहिती अशी की, कमलाबाई क्षीरसागर ह्या हदगाव शहरातील गौतमनगर येथील रहिवासी असून हदगाव तहसील कार्यालयात शिपाई पदी कार्यरत होत्या. कमलबाई यांना एकुलता एक मुलगा होता. त्याला दारूचे व्यसन होते. या दारूमुळे त्याचे लिव्हर खराब झाल्याने त्याचा दोन महिन्यापूर्वीच मृत्यू झाला होता. विधवा सुनेसह कमलाबाई एकाच घरात राहत होत्या. लग्नाच्या काही वर्षा पासून सुनीता नागेश्वर क्षीरसागर (वय 35) नामक सुनेचे परमेश्वर वानखेडे या 26 वर्षीय तरुणाना सोबत प्रेम प्रकरण सुरु होते. पतीच्या निधनानंतर दोघात जवळीकता अधिक वाढली होती. सुनेचं इतर तरुणासोबत अनैतिक संबंध सुरु असल्याची कुणकुण सासूला लागली. या कारणावरून सासू सुनेमध्ये वाद व्हायचे. शेवटी सुनेने प्रियकरासोबत कट रचला. 10 जानेवारी रोजी कमलाबाई ह्या घरातील खोलीत झोपली असताना सुनीता आणि तिचा प्रियकर प्रमेश्वर या दोघांनी स्कार्पने गळा आवळून खून केला.
दरम्यान, यानंतर महिलेने भाऊ अमोल इटकरे याला फोन करून घरी बोलवले आणि घटनेची माहिती दिली. अमोल याने आपल्या नातेवाईकाला सोबत घेऊन कमलाबाईचा मृतदेह पोत्यात भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाळकी फाटा येथील कोरड्या नदीत फेकून दिले. 13 जानेवारी रोजी मयताच्या नातूने हदगाव पोलीस ठाण्यात मीसिंग दाखल केली. मात्र काही तासातच कमलाबाई यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. सीसीटिव्ही आणि माबाईल लोकेशन तपासले असता घटनेच्या 13 दिवसानंतर धक्कादायक बाब समोर आली. अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने सुनेने प्रियकराच्या मदतीने सासूचा खून केल्याचे निष्पन्न झाले. हदगाव पोलिसांनी सुनीता क्षीरसागर, परमेश्वर वानखेडे अमोल इटकरे, अक्षय कदम या चार आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे करत आहेत. चार ही आरोपीना न्यायालयाने 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.










