मालेगाव : प्रजासत्ताक दिनी फुग्यात गॅस भरताना सिलिंडरचा झाला स्फोट, दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी
Malegoan News : मालेगावात पोलीस परेडच्या मैदानापासून काही अंतरावर एका फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या झालेल्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या स्फोटात एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रध्वजाला वंदन करताना ही धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फुग्यात गॅस भरताना सिलिंडरमध्ये मोठा स्फोट
एकूण सात जण स्फोटात जखमी

हे ही वाचा : बहीण-भावाच्या नात्याला काळीमा, चुलत भावाने 3 वर्षाच्या बहिणीला धर्म शाळेत नेत केले अत्याचार, नंतर...
फुग्यात गॅस भरताना सिलिंडरमध्ये मोठा स्फोट
आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी, मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. परेड ग्राउंडपासून सुमारे 250 किमी अंतरावर एक फुगे विक्रेता नायट्रोजन गॅसने फुगे भरून विक्रीचे काम करत होते. त्याच क्षणी, गॅस भरताना सिलिंडरमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, तो दूरवर ऐकू आला, नंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
एकूण सात जण स्फोटात जखमी
प्रजासत्ताक दिनासाठी फुगे खरेदी करण्यासाठी काही नागरिकांनी विक्रेत्याभोवती गर्दी केली होती, तेव्हाच हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. या अपघातात विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला जाधव आणि उज्ज्वला महाजन यांच्यासह इतर एकूण सात जण या स्फोटात जखमी झाले. दोन मुलं, दोन महिलांसह इतर आणखी दोघे जण गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांना अपार धन, संपत्तीचा लाभ होणार, तर काही राशींना... जाणून घ्या राशीभविष्य
गॅस सिलिंडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्फोट
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तात्काळपणे घटनास्थळी पोहोचले आणि परिसराला घेराव घातला. नंतर फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलिंडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. या घटनेनं आनंदाच्या दिवसाला विरजन प्राप्त झालं आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.