बहीण-भावाच्या नात्याला काळीमा, चुलत भावाने 3 वर्षाच्या बहिणीला धर्म शाळेत नेत केले अत्याचार, नंतर...
crime news : देशात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाही. चुलत भावानेच आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे. या मन हेलावणाऱ्या घटनेनं भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चुलत भावाने आपल्याच बहिणीला धर्मशाळेत नेत केला अत्याचार
नराधमाने पीडितेच्या वडिलांवर हल्ला केला
Crime News : देशात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाही. चुलत भावानेच आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे. या मन हेलावणाऱ्या घटनेनं भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासली आहे. बिहारच्या पटणा येथील ही घटना असून सलीमपूर पोलिस ठाण्याअंतर्गत एका 3 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने हैवानी कृत्य घडलं आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांना अपार धन, संपत्तीचा लाभ होणार, तर काही राशींना... जाणून घ्या राशीभविष्य
चुलत भावाने आपल्याच बहिणीला धर्मशाळेत नेत केला अत्याचार
संबंधित प्रकरणाची माहिती स्थानिक नेते सूरज कुमार बंटी यांनी दिली आहे. त्यांनी या प्रकरणी सांगितलं की, अल्पवयीन मुलगी तिच्या घराजवळ खेळत होती. तेव्हा तिचा अल्पवयीन चुलत भाऊ तिला जवळच्या घराजवळील एका धर्मशाळेत घेऊन गेला होता, नंतर तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं आहे.
नराधमाने पीडितेच्या वडिलांवर हल्ला केला
या घटनेची माहिती लपवण्यासाठी नराधमाने पीडितेच्या वडिलांवर हल्ला केला. सलीमपूर पोलिसांनी महिला पोलिसांनी अल्पवयीन मुलीला रात्री 10 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी बाढ उपविभागीय रुग्णालयात आणण्यात आले होते. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर अल्पवयीन मुलीला घरी पाठवण्यात आले होते. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलगी मजूर म्हणून कार्यरत आहेत. संबंधित प्रकरणात बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी भावाला अटक केली आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? साताऱ्यातील दुर्गम भागात DRI ची धाड, 55 कोटींचं ड्रग्ज अन् कच्चा माल जप्त
नालंदा येथे घटनेची पुनरावृत्ती
यापूर्वी नालंदा येथे देखील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. चार जणांनी चिमुरडीचे गयाजी येथून अपहरण करत नालंदाच्या एका निर्जनस्थळी नेत आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला होता. संबंधित प्रकरणात तीन जणांसह एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.










