महाराष्ट्रावर शोककळा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

मुंबई तक

Deputy Chief Minister Ajit Pawar Death in Plane Crash : अजितदादांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. गेल्या सुमारे चार दशकांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. ठाम निर्णयक्षमता आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले, वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालाय. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रावर शोककळा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

Deputy Chief Minister Ajit Pawar Death in Plane Crash  :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघातात मृत्यू झाल्याची  माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झालाय. अजितदादांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. गेल्या सुमारे चार दशकांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. ठाम निर्णयक्षमता आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले, वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालाय. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, दादांच्या निधनाची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार दिल्लीहून महाराष्ट्राकडे रवाना झाल्या आहेत. शरद पवार मुंबईत असल्याची माहिती आहे.  बारामती दौऱ्यावर असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीत येणार होते. विमान लँडिंग करत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. डीजीसीएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह वैमानिक आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या सुरक्षा पथकासह आणि कर्मचारी वर्गासोबत आज सकाळी सुमारे 7 वाजता मुंबईहून 8 आसनी चार्टर्ड विमानाने रवाना झाले होते. हे विमान बारामतीकडे जात होते. बारामती तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचे आज विविध ठिकाणी जाहीर सभांचे नियोजन होते.

त्यांच्या आजच्या दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार बारामती तालुक्यात चार प्रमुख सभांना ते उपस्थित राहणार होते. सकाळी 10 वाजता निरवाघज, दुपारी 12 वाजता पंढरे, दुपारी 3 वाजता करंजेपूल आणि सायंकाळी 5.30 वाजता सुपा येथे जाहीर सभा होणार होती. मात्र, या कार्यक्रमांच्या नियोजित वेळेच्या आधीच विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातस्थळी तातडीने आपत्कालीन सेवा दाखल करण्यात आल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विमानातील 6 जणांचा मृत्यू झालाय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp