शेतकऱ्याची हत्या करुन मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला, बायकोच्या डिलिव्हरीसाठीचे पैसे घेऊन जात असताना घात

मुंबई तक

Crime News : एका शेतकऱ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेची माहिती समजताच सबंध परिसरात एकच खळबळ उडाली. रुग्णालयात असलेल्या गर्भवती पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरातून 25 हजार रुपये घेऊन तो घराबाहेर पडला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेतकऱ्याची हत्या करुन मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला

point

बायकोच्या डिलिव्हरीसाठीचे पैसे घेऊन जात असताना घात

Crime News : एका शेतकऱ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेची माहिती समजताच सबंध परिसरात एकच खळबळ उडाली. रुग्णालयात असलेल्या गर्भवती पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरातून 25 हजार रुपये घेऊन तो घराबाहेर पडला होता. उत्तरप्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सुशील कुमार असं ३० वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे. 

हे ही वाचा : गोंदिया : शेजाऱ्यानेच चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला; 20 लाखांचा ऐवज लंपास; आरोपींना मध्यप्रदेशातून अटक

हत्या की आत्महत्या?

सुशील कुमार हा फतेहपूर जिल्ह्यातील अचितपुर गावचा रहिवासी होता. तो गावातच शेती करत असे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलची पत्नी गर्भवती असून तिला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या खर्चासाठी नातेवाईकांकडून 25 हजार रुपये उसने घेऊन तो घरी आला होता. यानंतर हे पैसे घेऊन तो रुग्णालयात जात होता. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच घात झाला.

गावकऱ्यांचा आरोप

गावातील बाजहा बाबा मंदिराच्या गेटला त्याचा मृतदेह लटकल्याचे समजताच गावकऱ्यांनी गर्दी केली. त्यांनी आरोप केला की ही आत्महत्या नसून हत्या आहे. ज्याप्रकारे त्याचा मृतदेह गेटला लटकला होता, त्यावरुन गावकऱ्यांनी हा आरोप केला. आधी त्याची हत्या करण्यात आली आणि ती आत्महत्या वाटावी यासाठी मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवण्यात आला. पोलिस दाखल झाल्यानंतर तर गावकऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला.

हे वाचलं का?

    follow whatsapp