शक्तीवर्धक गोळ्या घेऊन बनायचा हैवान, अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीने पतीला दुधात विष घालून संपवलं
Gujarat Crime News : महिलेने आपल्या पतीला हळदीचे दूध दिले होते. त्या दुधात तिने उंदरामारण्याचं औषध मिसळल्याचा आरोप आहे. मात्र त्या वेळी पतीचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी, 5 जानेवारीलाच महिलेने पतीचा गळा दाबून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शक्तीवर्धक गोळ्या घेऊन बनायचा हैवान
अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीने पतीला दुधात विष घालून संपवलं
Gujarat Crime News, सूरत : गुजरातमधील सूरत शहरात एका 37 वर्षीय महिलेने पतीची हत्या केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र पतीच्या भावाने अंत्यसंस्काराबाबत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक अहवालात विषप्रयोग व गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.
ही घटना सूरतमधील लिम्बायत परिसरातील असून संबंधित दाम्पत्य मूळचे बिहारचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक एन. के. कमलिया यांनी सांगितले की, 5 जानेवारी रोजी महिलेने आपल्या पतीला हळदीचे दूध दिले होते. त्या दुधात तिने उंदरामारण्याचं औषध मिसळल्याचा आरोप आहे. मात्र त्या वेळी पतीचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी, 5 जानेवारीलाच महिलेने पतीचा गळा दाबून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुरुवातीला पत्नीने पतीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांकडून प्राथमिक तपासात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.
हेही वाचा : महालक्ष्मी अन् तुळजाभवानीचं दर्शन घेऊन विठुरायाच्या दर्शनाला निघाले, पण वाटेत काळाचा घाला; चौघांचा मृत्यू
मृताच्या भावाने अंत्यसंस्काराबाबत आक्षेप घेतला. पत्नी मृतदेहाचा तिथेच तातडीने अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरत होती. याच वादातून मृताच्या भावाला संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करत सखोल तपासाची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे फॉरेन्सिक परीक्षण करण्याचे आदेश दिले. फॉरेन्सिक अहवालात मृत्यू हा नैसर्गिक नसून विषप्रयोग आणि गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत महिलेने आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.










