सासऱ्याचा सून अन् नातीसोबत भयानक कांड, घरी परतताच मुलगा हादरला; धक्कादायक प्रकरण

मुंबई तक

Crime News : नवरा घरी नसताना सासऱ्याने भयानक कांड केल्याची घटना समोर येत आहे. सासऱ्याचे आणि सासूचे काही कारणावरुन भांडण झाले. यानंतर संतापलेल्या सासऱ्याने हातोड्याने वार करत त्याच्या पत्नीसह सून आणि चार वर्षांच्या नातीच्या डोक्यात हातोडा घालून त्यांची हत्या केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सासऱ्याचा सून अन् नातीसोबत भयानक कांड

point

घरी परतताच मुलगा हादरला

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : नवरा घरी नसताना सासऱ्याने भयानक कांड केल्याची घटना समोर येत आहे. सासऱ्याचे आणि सासूचे काही कारणावरुन भांडण झाले. यानंतर संतापलेल्या सासऱ्याने हातोड्याने वार करत त्याच्या पत्नीसह सून आणि चार वर्षांच्या नातीच्या डोक्यात हातोडा घालून त्यांची हत्या केली आहे. या हत्येच्या वेळी आरोपीचा मुलगा काही कामानिमित्त घराबाहेर गेला असल्याचे समोर आले आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी (11 मार्च) रात्री ओरिसातील देवगड जिल्ह्यात ही घटना घडली.

हे ही वाचा : 'नवरा माझ्यासमोरच सख्ख्या बहिणीसोबत संबंध ठेवतो, पोलिस कारवाईला घाबरतात..' बायकोची महिला आयोगाकडे तक्रार

हातोड्याने वार करुन हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय रमेश गरिया असे या आरोपीचे नाव आहे. बुधवारी रात्री रमेशचे त्याची पत्नी गुल गरिया हिच्याशी कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात रमेशने पत्नीवर हातोड्याने हल्ला केला. यावेळी सून लिपी आणि 4 वर्षांची नात ईशानी या दोघी मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता, आरोपीने त्यांच्यावरही अमानुषपणे वार केले. या भीषण हल्ल्यात तिघींचाही जागीच मृत्यू झाला.

मुलगा घरी परतल्यावर बसला धक्का

धक्कादायक बाब म्हणजे, हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी हातोडा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. घटनेच्या वेळी आरोपीचा मुलगा घरात नव्हता. तो व्यवसायाने ड्रायव्हर असून कामानिमित्त बाहेर गेला होता. जेव्हा तो घरी परतला, तेव्हा त्याला आपली आई, पत्नी आणि चिमुकल्या मुलीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याने तातडीने  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp