बलात्कार करुन चिरला गळा, रुग्णालयात नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळेना, महिलेसोबत शेवटी काय घडलं?

मुंबई तक

पीडित महिला नेहमीप्रमाणे नदीवर स्नानासाठी गेली होती. वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपीने तिला अडवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बलात्कार करुन चिरला गळा

point

रुग्णालयात नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळेना

point

महिलेसोबत शेवटी काय घडलं?

Crime News : ओडिशाच्या ढेंकानाल जिल्ह्यातून एक अंगावर शहारे आणणारी क्रूर घटना समोर आली आहे. एका स्थानिक महिलेवर नराधमाने केवळ बलात्कारच केला नाही, तर तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा छिन्नविछिन्न करून तिचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, नराधमाच्या या अमानुष कृत्याने माणुसकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नदीवर गेली असता घडलं भयानक

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नेहमीप्रमाणे नदीवर स्नानासाठी गेली होती. वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपीने तिला अडवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला आणि तिच्या चेहऱ्यावर वार करून तिला मरणासन्न अवस्थेत सोडून पळ काढला. ही घटना इतकी भीषण होती की, प्रत्यक्षदर्शींनी तिची अवस्था पाहून थरकाप उडाला.

हे ही वाचा : डोंबिवलीतील कुख्यात रील स्टारचा काळा कारनामा उघड,12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा

गुराख्याला गंभीर अवस्थेत आढळली

भयानक हल्ल्यानंतर ही महिला अनेक तास रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच पडून होती. ती घरी न परतल्याने चिंताग्रस्त कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. अखेर एका गुराख्याला ती गंभीर अवस्थेत आढळून आली. मात्र, या घटनेने स्थानिक आरोग्य व्यवस्थेचेही धिंडवडे काढले आहेत. प्रकृती चिंताजनक असतानाही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने तिला सायकल रिक्षा वापरुन रुग्णालयात न्यावे लागले. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून यंत्रणेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : बायकोचा वाढदिवस साजरा केला अन् गमावला जीव, आईला वेगळाच संशय; अखेर समोर आले 'ते' सत्य

जबाब नोंदवल्यानंतरच हत्येचा उलगडा

सध्या या महिलेवर कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ढेंकानालचे पोलीस अधीक्षक अभिनव सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. "पीडिता सध्या काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही, तिचा जबाब नोंदवल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल," असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

हे वाचलं का?