डोंबिवलीतील कुख्यात रील स्टारचा काळा कारनामा उघड,12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा
Dombivli Crime News : सुमारे 12 वर्षापुर्वी खून करून मृतदेहाची अज्ञातस्थळी विल्हेवाट लावल्याचा अतिशय गंभीर गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सुरेंद्र पांडुरंग पाटील यांने ज्या लोखंडी रॉडने करण अरविंद बागुल याचा खून केला होता तो लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोंबिवलीतील कुख्यात रील स्टारचा काळा कारनामा उघड
12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा उलगडा
Dombivli Crime News , डोंबिवली : सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुन्हेगारी चेहरा उघडकीस आला असून तब्बल 12 वर्षांपूर्वीच्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखेने अखेर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सुरेंद्र पाटीलसह चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत उर्फ छोटू या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 4 ऑक्टोबर 2014 रोजीची असून सात एकर जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून दावडी येथील तरुण करण बागुल याचे अपहरण करण्यात आले होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी करणला दावडी येथील कार्यालयात नेले आणि तेथे सुरेंद्र पाटील याने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार करत निर्दयीपणे हत्या केली.
खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह कारमध्ये टाकून मुरबाड येथील बारवी धरणाजवळील जंगल परिसरात नेऊन विल्हेवाट लावली. त्या काळात मुरबाड पोलिसांना सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची नोंद आणि नव्याने मिळालेल्या धागेदोऱ्यांची सांगड घालत कल्याण गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला. गुन्हे शाखा घटक-03 च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
हेही वाचा : क्रूरतेचा कळस, 12 वर्षीय मुलावर सामूहिक बलात्कार, गुप्तांगात रॉड टाकून केली मारहाण; शहर हादरलं
या प्रकरणात अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करणे अशा गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला असून न्यायालयाने तिन्ही आरोपींना 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खूनासाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत.









