बायकोचा वाढदिवस साजरा केला अन् गमावला जीव, आईला वेगळाच संशय; अखेर समोर आले 'ते' सत्य

मुंबई तक

चार महिन्यांपूर्वी झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असून, हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आईला मुलाच्या मृत्यूबाबत संशय असल्याने त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले, त्यानंतर 5 जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोचा वाढदिवस साजरा केला अन् गमावला जीव

point

आईला आला वेगळाच संशय

point

अखेर समोर आले 'ते' सत्य

Crime News : आग्रा येथील ट्रान्स यमुना परिसरात चार महिन्यांपूर्वी झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असून, हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. यतेंद्र पाल या तरुणाची त्याच्या पत्नीने आणि सासऱ्याने मिळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यतेंद्र एका कारखान्यात काम करत होता आणि तीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह तनु नावाच्या तरुणीशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात खटके उडू लागल्याने तनु आपल्या माहेरी राहू लागली होती.

आईला मुलाच्या मृत्यूबद्दल संशय

ही घटना 22 नोव्हेंबर 2025 रोजी घडली, जेव्हा यतेंद्र आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासरी गेला होता. त्या रात्री अचानक त्याची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते आणि पोस्टमार्टम अहवालातही काहीच निष्पन्न न झाल्यामुळे व्हिसरा सुरक्षित ठेवण्यात आला होता. यतेंद्रच्या आईला मात्र मुलाच्या मृत्यूबाबत संशय असल्याने त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले, त्यानंतर 5 जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा : Personal Finance: पैसेही वाचतील, घरखर्चही सुरळीत होईल! 'हे' प्लॅनिंग म्हणजे Golden Opportunity!

सासरा आणि बायकोने अशी केली हत्या

तपासादरम्यान फॉरेन्सिकचा अहवाल प्राप्त झाला, ज्यामध्ये यतेंद्रचा मृत्यू 'सल्फास' या विषारी द्रव्यामुळे झाल्याचे सिद्ध झाले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पत्नी तनु आणि सासरा महेंद्र यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी यतेंद्र आणि त्याच्या सासरच्या मंडळींमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात सासरा महेंद्रने दारूमध्ये सल्फास मिसळले आणि यतेंद्रला ती पिण्यास भाग पाडले, ज्यामुळे त्याचा काही वेळातच मृत्यू झाला.

हे ही वाचा : गावात प्रेमप्रकरणातून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या, 40 घरे जाळत केली दगडफेक; घटनेचा रक्तरंजित थरार 

चार महिन्यांनी उकलले गूढ

गेल्या चार महिन्यांपासून हे हत्याकांड एक गूढ बनले होते, परंतु पोलिसांनी आता या गुन्ह्याचा छडा लावला आहे. यतेंद्रच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि सासऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. घरगुती वादातून जावयाचा काटा काढणाऱ्या या सासऱ्याच्या आणि पत्नीच्या क्रूर कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 

हे वाचलं का?