गावात प्रेमप्रकरणातून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या, 40 घरे जाळत केली दगडफेक; घटनेचा रक्तरंजित थरार 

मुंबई तक

crime news : गावात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री झालेल्या या रक्तरंजित घटनेनं घटनास्थळ हादरून गेले आहे. नागरिकांनी संतप्त होऊन तब्बल 40 घरे जाळून टाकली आहेत. जाळपोळ आणि दगडफेक करत दहशतीचं वातावरण निर्माण झाले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमप्रकरणातून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या 

point

40 घरे जाळून जमाव संतप्त 

Crime News : राजस्थानाच्या उदयपूरमधील बांसवाडा जिल्ह्यातील मोटागाव पोलीस ठाणे हद्दीतील तामतिया गावात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री झालेल्या या रक्तरंजित घटनेनं घटनास्थळ हादरून गेले आहे. नागरिकांनी संतप्त होऊन तब्बल 40 घरे जाळून टाकली आहेत. जाळपोळ आणि दगडफेक करत दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेक कुटुंब बेघर झालीत, नागरिकांनी पोलिसांना माहिती देत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस फाटा तैनात केला. 

हे ही वाचा : जालना : अंत्यविधीसाठी आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, घटनेनं शहर हादरलं

प्रेमप्रकरणातून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या 

प्रेयसीच्या भावाचे आणि प्रियकर तरुणाचे अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. याच शत्रुत्वामुळे तरुणाची कुऱ्हाडीने तोडून हत्या करण्यात आली. या हत्येची बातमी पसरताच गावकऱ्यांनी हल्ला करत परिसरात जाळपोळ केली. परिस्थितीची माहिती घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

या  घटनेनंतर सोमवारी सकाळी जळलेल्या घरांतून धूर निघत होता. गावात स्मशान शांतता पसरली होती, लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. मोटागाव पोलीस अधिकाऱ्याने याबाबत सांगितलं की, हे प्रकरण प्रेमसंबंधाशी निगडीत आहे. दोन्ही पक्षांनी मिळून याआधीच गुन्हे दाखल केले होते. रविवारी रात्री परिस्थिती बिघडली आणि दुर्दैवी घटना घडली. अशातच पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना आपल्या ताब्यात घेतले. 

हे ही वाचा : भयंकर... मीरारोडमध्ये धर्म विचारून चाकूने भोसकले, अवघ्या परिसरात प्रचंड भीती!

40 घरे जाळून जमाव संतप्त 

प्रेमप्रकरणातून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या करत खून करण्यात आला. तसेच संतप्त झालेल्या जमावाने 40 घरे जाळून संताप व्यक्त केला, या घटनेनं परिसर हादरला. आगीत अनेक घरे होरपळून निघाली. परिस्थिती बघता, स्त्रिया आणि इतर कुटुंब रात्रीच्यावेळी गावातून पळून गेले. अग्मिशन दलाला थांबवले आणि नंतर पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे. अशातच गावकऱ्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली.   
 

हे वाचलं का?