भयंकर... मीरारोडमध्ये धर्म विचारून चाकूने भोसकले, अवघ्या परिसरात प्रचंड भीती!
Mira Road crime : मीरा रोड येथील नया नगरमध्ये 27 एप्रिल 2026 रोजी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मुस्लिम तरुणाने दोन हिंदू सुरक्षारक्षकांना धर्म विचारत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही सुरक्षारक्षकांना धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला असता, दोघांना गंभीर जखमी केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन वेळा कलमा वाचण्यास जबरदस्ती
जखमी सुरक्षारक्षकांची ओळख समोर
Mira Road Crime : मीरा रोड येथील नया नगरमध्ये 27 एप्रिल 2026 रोजी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मुस्लिम तरुणाने दोन हिंदू सुरक्षारक्षकांना धर्म विचारत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणात जखमी झालेल्या तरुणांची ओळख समोर आली आहे.
हे ही वाचा : चार तरुणांनी 'आंटी आय लव्ह यू' म्हणत महिलेला भररस्त्यात छेडलं, ती भडकली अन् मग सुरु झाला भयंकर खेळ
जखमी सुरक्षारक्षकांची ओळख समोर
जखमी सुरक्षारक्षकांची ओळख, सुब्रतो सेन आणि मिश्रा अशी झाली आहे. मिश्रा यांच्यावर मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या जखमींवरही उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली.
तीन वेळा कलमा वाचण्यास जबरदस्ती
घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दोघांनाही धर्म विचारला, नंतर तीन वेळा कलमा वाचण्यास जबरदस्ती करण्यात आली होती. त्या सुरक्षारक्षकांनी नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकूने सपासप वार करत संपवले. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिला असता, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला.
हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती, मे महिन्याच्या 'या' तारखेपासून काही राशींचं नशीब पालटेल
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा मीरा रोड येथील नया नगरमधील रहिवासी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस संबंधित आरोपीच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी तपासली जात आहे. या घटनेनं परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.









