खोलीत महिलेचा नग्नवस्थेत कुजलेला मृतदेह, घटनास्थळी कंपनीचे आढळले ओळखपत्र; पोलीसही गांगरले...
crime news : एका फ्लॅटमध्ये नग्नवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेह काही दिवसांपूर्वीचा कुजलेल्या अवस्थेत छिन्नविछिन्न पडला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला असून भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
खोलीत महिलेचा नग्नवस्थेत आढळला मृतदेह
घटनास्थळी कंपनीचे आढळले ओळखपत्र
Crime News : एका फ्लॅटमध्ये नग्नवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेह काही दिवसांपूर्वीचा कुजलेल्या अवस्थेत छिन्नविछिन्न पडला होता. मृत महिलेचं अंदाजे वय 34 वर्षे असण्याची शक्यता आहे. ही घटना बंगळुरूत घडली होती, या घटनेनं परिसर हादरून गेला असून भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृत महिलेचं नाव पूजा दत्त असे होते, ती मूळची झारखंड येथील धनबाद येथील मूळची रहिवासी होती.
हे ही वाचा : 'आई दादासोबत खिडकी बंद करून..', आईचे-मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा बापाला संशय; पोराचा झोपेत...
खोलीत महिलेचा नग्नवस्थेत आढळला मृतदेह
याबाबत सांगण्यात येतंय की, तिने नुकतीच एका खासगी कंपनीतील नोकरी सोडली होती. गेल्या तीन वर्षांपासून बंगळुरू येथे ती भाडेतत्त्वावर राहत होती. घरातील मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शेजाऱ्यांना सोमवारी या घटनेची माहिती मिळाली होती. महिलेचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात खोलीत नग्नवस्थेत आढळून आला होता.
खोलीत खासगी कंपनीचे आढळले ओळखपत्र
तपासादरम्यान, खोलीतील एका खासगी कंपनीचे ओळखपत्र आढळले आणि तसेच काही फाटलेले कागदपत्रे सापडले. मात्र, घटनास्थळी कोणतीही आत्महत्या केलेली सुसाईड नोट आढळून आली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, दरवाजा आतून बंद करण्यात आला होता, प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण आत्महत्येचं असल्याची माहिती आहे, परंतु हत्येसह सर्वच बाबींचा तपास केला जात आहे.
हे ही वाचा : 'मुलीचा घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न जुळव, तरुणीच्या वडिलांचा नकार; प्रियकराने हातोड्याने बापाला ठेचून ठार मारलं
संबंधित मृत महिला 23 एप्रिल रोजी किराणा मालेच सामान आणण्यासाठी गेलेली शेवटची दिसली होती. पोलिसांनी हा अनैसर्गिक मृत्यूचा संशय व्यक्त करत नोंद केली, नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न केला. पोलीस सर्वच बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.









