घोंगडीला शेळीचे केस चिटकलेले दिसले, अन् चिमुरड्या मुलीची हत्या करणारा सापडला, नेमकं काय घडलं?
Crime News : पाटणा येथे 10 वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या नराधमाला बकरीच्या केसांमुळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घोंगडीला शेळीचे केस चिटकलेले दिसले
अन् चिमुरड्या मुलीची हत्या करणारा सापडला, नेमकं काय घडलं?
Crime News : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या नजरेतून वाचण्यासाठी तो मागे एखादा पुरावा सोडतोच, याचा प्रत्यय पाटणा शहरात आला आहे. शहरी भागातील जल्ला महावीर मंदिराजवळ एका 10 वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना केवळ शेळीच्या केसांनी पोलिसांना खुन्याच्या दारापर्यंत पोहोचवले. 23 एप्रिल रोजी एका अरुंद गल्लीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका घोंगडीत गुंडाळलेला या मुलीचा मृतदेह सापडला होता. ही मुलगी घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता आणि पोलिसांवर आरोपीला पकडण्यासाठी मोठा दबाव होता.
तपासाची चक्रे आणि शेळीच्या केसाचा सुगावा
पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय के. शर्मा यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांची नजर त्या घोंगडीवर पडली ज्यामध्ये मृतदेह गुंडाळला होता. या घोंगडीची बारकाईने तपासणी केली असता त्यावर शेळीचे काही केस चिकटलेले आढळले. या एका लहानशा सुगाव्यावरून पोलिसांनी असा अंदाज लावला की, आरोपी आसपासचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे शेळ्या पाळलेल्या असाव्यात. पोलिसांनी तातडीने परिसरातील गल्ल्यांची झडती सुरू केली. एका बंद खोलीबाहेर 4-5 शेळ्या बांधलेल्या दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्या खोलीला बाहेरून कुलूप होते, मात्र संशयावरून कुलूप तोडले असता आत आरोपी रंजीत लपलेला आढळला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने बाहेरून कुलूप लावून घेतले होते आणि पंखा न लावता आत बसल्याने तो घामाने ओला झाला होता.
हेही वाचा : बायकोच्या प्रियकराने दिली धमकी, घाबरून नवऱ्याने केली आत्महत्या; दोन ओळींच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
अत्याचाराचा प्रयत्न आणि दगडाने वार









