'तू चिकन का बनवले नाहीस?' नवरा बायकोवर चिडला, संतापलेल्या बायकोने विळा घेतला अन्..

मुंबई तक

चिकन बनवण्यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर एका हत्येत झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

तू चिकन का बनवले नाहीस?

point

नवरा बायकोवर चिडला

point

संतापलेल्या बायकोने विळा घेतला अन्..

Crime News : रात्रीच्या जेवणात चिकन का बनवले नाही, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील कामारेड्डी शहरात घडली आहे. 28 वर्षीय भंगार विक्रेत्या पतीची त्याच्या बायकोने विळ्याने वार करून हत्या केली. कोदंडम शिवाजी (रा. गोसांगी कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी त्याची बायको लक्ष्मी हिला अटक केली आहे. शनिवारी (25 एप्रिल) रात्री 9 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

चिकन का बनवले नाहीस?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कोदंडम शिवाजी यांनी घरी आल्यावर जेवणात चिकन का बनवले नाही, यावरून पत्नी लक्ष्मीशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत गेल्याने जवळच राहणारे त्यांचे नातेवाईक दादाया आणि शारदा यांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले. मात्र, नातेवाईक निघून गेल्यानंतर काही वेळातच शिवाजीने पुन्हा वादाला तोंड फोडले. घरगुती कारणांवरून आणि आपल्या पसंतीचे जेवण न मिळाल्यामुळे त्याने लक्ष्मीला अर्वाच्य भाषेत सुनावले, ज्यामुळे घरातील वातावरण पुन्हा तापले.

हे ही वाचा : बायकोच्या प्रियकराने दिली धमकी, घाबरून नवऱ्याने केली आत्महत्या; दोन ओळींच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

रागाच्या भरात विळ्याने वार

दोघांमधील भांडण विकोपाला गेल्यावर नंदिनी नावाच्या अन्य एका नातेवाईकाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. याच रागाच्या भरात लक्ष्मीने घरात असलेला विळा उचलला आणि थेट शिवाजीच्या मानेवर वार केला. या हल्ल्यामुळे शिवाजी जागीच कोसळला आणि खाली पडताना त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती कामारेड्डीचे पोलिस निरीक्षक बी. नरहरी यांनी दिली.

हे ही वाचा : 14 वर्षीय मुलीचे तोंड अन् हात पाय बांधले, साथीदारांच्या डोळ्यादेखत नको तेच...; घटनास्थळ हादरले

मृताच्या भावाने काय सांगितले?

मृत शिवाजी यांचा मोठा भाऊ सूरी याने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजी आणि लक्ष्मी यांचा विवाह सहा वर्षांपूर्वी झाला असून त्यांना दोन मुली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यात वारंवार घरगुती कारणांवरून भांडणे होत असत आणि अनेकदा वडीलधाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यांचे वाद मिटवले होते. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सोमवारी (27 एप्रिल) तिला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
 

हे वाचलं का?