डोंबिवली : 'चल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार करु', पण मित्राने तरुणीला नेलं निर्जनस्थळी; अन्...

मुंबई तक

Dombivli Crime : डोंबिवलीत एका अनाथ तरुणीला मैत्रिणीच्या पालकांनी मारहाण केल्यानंतर, मदतीला आलेल्या स्नॅपचॅटवरील मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

Dombivli Crime
Dombivli Crime
google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवली : तरुणीला मैत्रिणीच्या कुटुंबियांकडून मारहाण

point

मित्राने पोलिसात जाण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेलं अन् ..

Dombivli Crime : डोंबिवली शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अनाथ तरुणीला तिच्याच मैत्रिणीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या मित्रानेच तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी डोंबिवलीत एका खासगी ठिकाणी नोकरी करते. तिला आई-वडील नसल्याने ती एकटीच राहते. काही दिवसांपूर्वी एका क्षुल्लक कारणावरून आणि खोटा आरोप करत तिच्या मैत्रिणीच्या आई-वडिलांनी तिला मारहाण केली होती. या मारहाणीत मैत्रिणीचा बाप देखील सामील होता. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडितेने पोलीस ठाण्यात जाण्याचे ठरवले, मात्र सोबत कुणी नसल्याने तिने तिच्या एका ओळखीच्या तरुणाला मदतीसाठी साद घातली. मात्र, त्यानेच निर्जनस्थळी तिच्यावर बलात्कार केलाय. 

मदतीचा बनाव आणि निर्जनस्थळी अत्याचार

पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वीच 'स्नॅपचॅट' या सोशल मीडिया ॲपवरून क्रिश भोईर नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. मैत्रिणीच्या घरच्यांनी केलेल्या मारहाणीनंतर तक्रार देण्यासाठी सोबत कुणी नसल्याने तिने क्रिशला बोलावून घेतले. क्रिश मदतीचे नाटक करत तिला मानपाडा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी आला. मात्र, पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी त्याने तिला एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे त्याने या अनाथ तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने पीडितेच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून घेतले, तिच्या 'जी-पे'वरून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले आणि तिचा मोबाईल हिसकावून घेऊन तिथून पसार झाला. या दुहेरी संकटामुळे पीडित तरुणी पूर्णपणे खचून गेली होती.

हेही वाचा : जालना : गोंदेगाव येथील खून प्रकरणाचा 8 तासांत उलगडा; दोन आरोपी जेरबंद; नेमकं काय घडलं?

शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाव आणि पोलिसांची कारवाई

हे वाचलं का?