बारामती : 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय पुरुषाकडून लैंगिक अत्याचार, संशयित आरोपीनं पोलीस कोठडीत संपवली जीवनयात्रा

मुंबई तक

Baramati Crime : बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीने पोलीस कोठडीत जीवन संपवलं. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेला आहे. तरुणाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, याचमुळे पुरूषाने टोकाचं पाऊल उचललं असे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Baramati Crime
Baramati Crime
google news

बातम्या हायलाइट

point

13 वर्षीच्या चिमुरडीवर 55 वर्षीय पुरुषाने लैंगिक अत्याचार करत संपवलं जीवन

point

दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप

Baramati Crime : बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीने पोलीस कोठडीत जीवन संपवलं. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेला आहे. तरुणाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, याचमुळे पुरूषाने टोकाचं पाऊल उचललं असे सांगण्यात येत आहे. आरोपी पुरूषाने पोलीस कोठडीच टोकाचं पाऊल उचलल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले. 

हे ही वाचा : मिसिंग लिंकवरुन जाण्यास 'या' वाहनांना बंदी, वेग मर्यादा किती? कधी होणार खुला? शासनाकडून अधिसूचना जारी

13 वर्षीच्या चिमुरडीवर 55 वर्षीय पुरुषाने लैंगिक अत्याचार करत संपवलं जीवन

संबंधित प्रकरणात जीवन संपवलेल्या पुरूषाचे नाव रवींद्र आनंदराव गार्डी (वय 55) अशी ओळख निर्माण झाली. रवींद्र गार्डीने 13 वर्षीच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला, नंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याच्या शनिवारी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असता, मंगळवारी मध्यरात्री त्याने पोलीस कोठडीत जीवन संपवलं. 

अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप

घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित आरोपीवर अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पुरुषाच्या हैवानी कृत्याने, अत्याचाराने पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. अशातच पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी रवींद्रवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : जालना : गोंदेगाव येथील खून प्रकरणाचा 8 तासांत उलगडा; दोन आरोपी जेरबंद; नेमकं काय घडलं?

फलटणच्या खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याची माहिती

पीडित मुलीच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या ओळखीच्या लोकांनी फलटणच्या खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यात आली. या संपूर्ण घटनेमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलं होतं. दरम्यान, आरोपीने पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्यानं पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. संबंधित घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?