जालना : गोंदेगाव येथील खून प्रकरणाचा 8 तासांत उलगडा; दोन आरोपी जेरबंद; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Jalna gondegav murder case : जालन्यातील गोंदेगाव येथील मच्छिंद्र दराडे यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 8 तासांत उलगडा केला असून आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Jalna gondegav murder case
Jalna gondegav murder case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालना : गोंदेगाव येथील खून प्रकरणाचा 8 तासांत उलगडा

point

दोन आरोपी जेरबंद; नेमकं काय घडलं?

Jalna gondegav murder case  : जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील मच्छिंद्र कोंडीबा दराडे या 55 वर्षीय व्यक्तीच्या खून प्रकरणाचा अवघ्या 8 तासांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. गोंदेगाव शिवारातील एका शेतात मच्छिंद्र दराडे यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मृताचा मुलगा पवन दराडे याने दिलेल्या फिर्यादीवरून जालना तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.

 सिंदखेडराजा येथून दोन आरोपी जेरबंद; दारूच्या नशेत झाला होता वाद

तपासादरम्यान पोलीस पथकाला गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली की, या प्रकरणातील संशयित आरोपी विनोद गोपीनाथ कुटे (वय 27) आणि सोमीनाथ प्रकाश गिते (वय 27) हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सिंदखेडराजा येथे धाव घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिलच्या रात्री तिघेही एकत्र बसून दारू पीत होते. दारूच्या नशेत असतानाच त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर एका भीषण हत्याकांडात झाले.

हेही वाचा : 'भाजपचं जिल्हा उपाध्यक्ष व्हायचं असेल तर माझ्यासोबत चल..', जिल्हाध्यक्षाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

 आईबद्दलचे अश्लील शब्द आणि चापट मारल्याचा राग ठरला जीवघेणा