AI चा वापर करून लेकीनंच आई-वडील आणि भावाला संपवलं

Crime News : एका तरुणीने आणि तिच्या लिव्ह -इन पार्टनरने मिळून AI चा वापर करून तिघांची हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू झाली आहे, नेमकं प्रकरण काय हे पुढे समजून सांगितले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सहा महिन्यांपासून AI चॅटबोटच्या मदतीने मर्डरचा प्लानिंग

point

श्वेता आणि केनेथ अटकेत 

Crime News : बंगळूरुमधील साई ग्रीन होम अपार्टमेंटमध्ये एक भीषण घटना उघडकीस आली आहे, जिथे  श्वेता (वय 24) आणि तिचा  लिव्ह-इन पार्टनर केनेथ ( वय 25) यांनी पैशांसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवले. श्वेताने तिची आई मुथ लक्ष्मी यांच्याकडून 50 लाख रुपये कर्ज घेतले होते आणि ते पैसे केनेथवर खर्च केले. जेव्हा तिच्या आईने पैसे परत मागितले, तेव्हा श्वेता आणि केनेथने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचे हे भीषण पाऊल उचलले. 

हे ही वाचा : Astrology : दिवाळीत 'या' राशींवर पैशाचा होणार वर्षाव

मृतांमध्ये श्वेताचे वडील सोमसुंदर (वय 52), आई मुथुलक्ष्मी (वय 48) आणि धाकटी बहीण सुप्रिया (वय 19) यांचा समावेश होता. या प्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. 

सहा महिन्यांपासून AI चॅटबोटच्या मदतीने मर्डरचा प्लानिंग

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब अशी की, आरोपी केनेथ हा मागील सहा महिन्यापासून AI चॅटबोटच्या मदतीने मर्डरचा प्लानिंग करत होता. खून केल्यानंतर रक्ताचे डग साफ करण्यासाठी नेमक्या कोणत्या रसायनांची आवश्यकता आहे, मृतदेह कसे पॅक केले जावे. पुरावे नष्ट करण्यासाठी भट्टीतच जाळले जाऊ शकते का? केनेथने फ्लॅटमध्ये भट्टी देखील तयार केली होती.  

हे ही वाचा : ऑनर किलिंग प्रकरण! दोन भावांनी मिळून बहिणीचा गळा दाबला, मृतदेह फासाला लटकला अन्...

श्वेता आणि केनेथ अटकेत 

 

हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी रोख रक्कम आणि दागिने घेऊन वेगवेगळ्या मार्गावर पुद्दुचेरीला पळून निघून गेले. मात्र, मृत्यूपूर्वी गंभीर जखमी असलेल्या वडील सोमसुंदर यांनी कसेतरी पाऱ्यांवर पोहोचून शेजाऱ्यांना सावध केले आणि मुलीला आणि केनेथची नावे पोलिसांना सांगण्यात आली होती. बेंगळुरू पोलिसांनी तांत्रिक देखरेखीच्या मदतीने श्वेताला पुद्दुचेरी येथील एका हॉटेलमधून आणि केनेथला दारूच्या दुकानाजवळून अटक करण्यात आली.