प्रेमविवाहानंतर महिलेचा शेजाऱ्यावर जडला जीव, अखेर 'त्या' तिघांमधील कुणाचा झाला शेवट?
अमित आणि नीलम यांचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला होत, मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा भ्रमनिरास झाला. लग्नानंतर काही काळातच नीलमचे अन्य एका व्यक्तीशी प्रेमसंबंध सुरू झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेमविवाहानंतर महिलेचा शेजाऱ्यावर जडला जीव,
अखेर 'त्या' तिघांमधील कुणाचा झाला शेवट?
Crime News : एका धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. बायकोने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. अमित कुमार (35) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मृताचा मोठा भाऊ श्रीराम मजुमदार याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 14 तासांच्या आत मुख्य आरोपी अमर उर्फ किरण कुमार याला अटक केली आहे. बिहारच्या लौरिया परिसरातील ही घटना आहे.
लग्नानंतर शेजाऱ्यावर जडला जीव
अमित आणि नीलम यांचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला होत, मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा भ्रमनिरास झाला. लग्नानंतर काही काळातच नीलमचे अन्य एका व्यक्तीशी प्रेमसंबंध सुरू झाले. या कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत असत. 23 एप्रिलच्या रात्री नीलम काही वेळ घराबाहेर गेली होती, त्यावरून झालेल्या वादानंतर 25 एप्रिलच्या रात्री नीलमने तिचा प्रियकर अमर आणि इतर साथीदारांच्या मदतीने अमितची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कटात अन्य काही लोकांचाही सहभाग असण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
हे ही वाचा : मिसिंग लिंकवरुन जाण्यास 'या' वाहनांना बंदी, वेग मर्यादा किती? कधी होणार खुला? शासनाकडून अधिसूचना जारी
'असा' रचला बनाव
विशेष म्हणजे, हत्येनंतर पत्नी नीलमने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक खोटी कथा रचली होती. पतीने बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि प्रतिकार करताना आपण गुप्तांगावर लाथ मारल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा दावा तिने केला होता. मात्र, पोलिसांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता, तिने इंटरनेटवर 'नशायुक्त औषधांविषयी' सर्च केल्याचे उघड झाले. या पुराव्यामुळे तिचा बनाव फसला आणि पोलिसांनी कडक चौकशी केली असता तिने आपला गुन्हा मान्य केला.
हे ही वाचा : मुंबईची खबर : पहाटे 1 ते 6 या वेळेतच कांजूर मार्ग डंपिंग ग्राऊंडमधून दुर्गंधी का येते? न्यायालायात काय घडलं?
कॉल डिटेल्सवरुन महत्त्वाचे धागेदोरे सापडले
पोलिसांनी सांगितले की, प्राप्त अर्जाच्या आधारे एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. नीलमच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्सवरून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळत आहेत. या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मटियरिया बंगाली कॉलनी परिसरात खळबळ उडाली आहे.









