रात्री बेडरुममध्ये पुतणीसोबत सापडला चुलता, सकाळी दोघेही गायब.., बदनामीच्या भीतीने बापाने विष खाल्लं

मुंबई तक

Crime News : सख्या चुलत्यानेच 16 वर्षीय पुतणीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भावाच्या या विश्वासघातामुळे हतबल झालेल्या पित्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री बेडरुममध्ये पुतणीसोबत सापडला चुलता

point

सकाळी दोघेही गायब.., बदनामीच्या भीतीने बापाने विष खाल्लं

Crime News : उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यातील खुटार परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका सख्या चुलत्याने आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन पुतणीचे अपहरण करून पवित्र नात्याला कलंकित केले आहे. शनिवारी रात्री उशिरा ही संपूर्ण घटना घडली असून, स्वतःच्याच लहान भावाने केलेल्या या विश्वासघातामुळे पीडित मुलीचे वडील मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. रक्षकच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा समाजात तोंड कसे दाखवायचे या विवंचनेतून हताश झालेल्या पित्याने विष प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्यरात्री चुलता पलंगाखाली लपलेला आढळला आणि पहाटे मुलगी बेपत्ता

या धक्कादायक प्रकरणाची सुरुवात शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास झाली. खुटार येथील रहिवासी असलेल्या या कुटुंबातील सर्वजण झोपलेले असताना अचानक मुलीच्या आईला जाग आली. तिने खोलीत प्रकाश केला असता, तिची 16 वर्षांची मुलगी पलंगावर बसलेली दिसली. काहीतरी संशयास्पद वाटल्याने आईने वडिलांना उठवले आणि खोलीची झडती घेतली. यावेळी पलंगाखाली मुलीचा सख्खा चुलता लपलेला असल्याचे पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने आपल्याच भाऊ आणि वहिनीला जोराचा धक्का दिला आणि अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. या राड्यामुळे घरात गोंधळ सुरू असतानाच, पहाटे चार वाजेच्या सुमारास संधी साधून मुलगी देखील घरातून रहस्यमयी पद्धतीने बेपत्ता झाली.

हेही वाचा : नाशिकहून भावाला भेटायला परभणीत आला, पण उष्माघाताने तरुणाचा जीव गेला, हात करपले; नाका तोंडातून रक्त

बदनामीच्या भीतीने पित्याने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ होताच जेव्हा पालकांनी मुलीचा शोध घेतला, तेव्हा आरोपी चुलताही आपल्या घरी नसल्याचे समोर आले. सख्या भावानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचे लक्षात येताच पीडित पित्याला मोठा धक्का बसला. समाजात होणारी बदनामी आणि रक्ताच्या नात्याने दिलेला हा घाणेरडा धोका सहन न झाल्याने त्याने विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या पीडित पित्याची मृत्यूशी झुंज सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?