मुंबईची खबर : पहाटे 1 ते 6 या वेळेतच कांजूर मार्ग डंपिंग ग्राऊंडमधून दुर्गंधी का येते? न्यायालायात काय घडलं?
मुंबईच्या पूर्व उपनगरातील 15 लाख लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने जोर दिला. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या अभ्यासातील दोन महत्त्वपूर्ण समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : पहाटे 1 ते 6 या वेळेतच कांजूर मार्ग डंपिंग ग्राऊंडमधून दुर्गंधी का येते?
न्यायालायात काय घडलं?
High Court on Kanjur Marg Dumping Ground: कांजूर मार्ग डंपिंग ग्राऊंडमधील मिथेन वायूच्या उत्सर्जनावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला चांगलेच फटकारले आहे. हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश द्यावे लागतील असा इशारा न्यायालयाने दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या डंपिंग ग्राऊंडला शनिवारी (25 एप्रिल) भेट दिली. या भेटीनंतर काल या डंपिंग ग्राऊंडमधून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाविषयी वैज्ञानिक पद्धतीने दररोज प्रत्यक्ष पाहणी करुन त्याचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील 15 लाख लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने जोर दिला. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या अभ्यासातील दोन महत्त्वपूर्ण समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं. पहिली समस्या म्हणजे पहाटे 1 ते 6 च्या दरम्यान येणारा दुर्गंध आणि दुसरी समस्या म्हणजे मिथेनचे उत्सर्जन.
कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड प्रकरणी दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यामधील एक याचिका विक्रोळी येथील कन्नमवार नगर परिसरातील नागरिकांनी दाखल केली आहे. या नागरिकांची बाजू अॅड. अभिजित राणे मांडत आहेत. तर दुसरी याचिका पर्यावरणवादी कार्यकर्ते दयानंद स्टॅलियन यांच्या वनशक्ती संस्थेनं दाखल केली आहे. अॅड. झमान अली हे या संस्थेतर्फे बाजू मांडत आहेत.
कांजूर मार्ग डंपिंग ग्राऊंडमुळे परिसरात दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत असल्याने प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. यावर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.









