देवेंद्र फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणार..इतक्यात पोलीस जीव तोडून धावले; कोल्हापुरात तुफान राडा VIDEO
Kolhapur Rada News : कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाकप कार्यकर्त्यांची पोलिसांशी जोरदार झटापट झाली. आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणार..
इतक्यात पोलीस जीव तोडून धावले..; कोल्हापुरात तुफान राडा
Kolhapur Rada News : कोल्हापूरच्या बिंदू चौक परिसरात आज (दि.27) राजकीय वातावरण कमालीचे तापल्याचे पाहायला मिळाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा राडा झाला. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला जात नसल्याने भाकपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. या आंदोलनामुळे बिंदू चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की; बिंदू चौकात गोंधळ
आंदोलकांनी फडणवीस यांचा पुतळा बाहेर काढताच पोलीस तातडीने पुतळा ताब्यात घेण्यासाठी धावले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते पुतळा दहन करण्यावर ठाम होते. बराच वेळ दोन्ही बाजूंनी ओढाओढी सुरू राहिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून पुतळा आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली, ज्यामुळे कार्यकर्त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
हेही वाचा : नाशिकहून भावाला भेटायला परभणीत आला, पण उष्माघाताने तरुणाचा जीव गेला, हात करपले; नाका तोंडातून रक्त
आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधातील कारवाईसाठी भाकप आक्रमक
भाकपच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. शिवाय प्रकाशक प्रशांत अंबी यांना त्यांनी शिवीगाळ केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. वारंवार मागणी करूनही गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्यामुळे थेट फडणवीस यांना जबाबदार धरत हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता. कार्यकर्त्यांच्या मते, सरकार जाणीवपूर्वक अशा प्रवृत्तींना पाठबळ देत आहे आणि त्यामुळेच त्यांना रस्त्यावर उतरून पुतळा दहन करावे लागत आहे. या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत आपला निषेध नोंदवला.









