बीड हादरलं, पत्नीचे आक्षेपार्ह फोटो, मित्रांनीच मित्राला धारदार शस्त्रांनी संपवलं, होमगार्डही हत्याकांडात सामील
Beed Crime News : बीडच्या बेलुरा गावात पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकल्याच्या संशयावरून मित्रांनीच सुमित गवते या तरुणाची क्रूर हत्या केली. याप्रकरणी होमगार्डसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड हादरलं, पत्नीचे आक्षेपार्ह फोटो,
मित्रांनीच मित्राला धारदार शस्त्रांनी संपवलं
होमगार्डही हत्याकांडात सामील
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेलुरा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. सुमित सुशील ऊर्फ सुशांत गवते या 19 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी संगनमत करून धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक जण होमगार्ड असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माझ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर का टाकले, या कारणावरून झालेल्या वादातून सुमितचा काटा काढण्यात आला. भरवस्तीत आणि ओळखीच्याच लोकांनी अशा प्रकारे कृत्य केल्याने बीड जिल्ह्यातील गुंडांवरील पोलिसांचा धाक संपला आहे का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हॅलिपॅडच्या मोकळ्या जागेत रचला मृत्यूचा सापळा
ही घटना 26 एप्रिल रोजी रात्री साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी शहादेव आश्राजी गवते हे आपल्या नातेवाईकासह मोटारसायकलवरून जात असताना, त्यांना नारायणगडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या हॅलिपॅडच्या मोकळ्या जागेत ओरडण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आवाज आला. त्यांनी मोटारसायकलच्या लाईटच्या उजेडात पाहिले असता, तीन लोकांनी सुमितला घट्ट पकडून ठेवले होते आणि चौथा आरोपी त्याला चाकूने भोकसत होता. फिर्यादी जवळ जाईपर्यंत आरोपींनी सुमितवर जीवघेणा हल्ला केला होता. सुमित रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून एका आरोपीला जागीच पकडले.
पत्नीचा फोटो आणि जुना वाद ठरला हत्येचे कारण
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुस्तुम गोवर्धन गवते याच्या पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो सुमितने दाखविल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. या वादाचा वचपा काढण्यासाठी रितेश सतीश बहिर, रुस्तुम गोवर्धन गवते, ज्ञानेश्वर दत्ता लाटे आणि सूरज मच्छिंद्र नागरगोजे यांनी जाणीवपूर्वक कट रचला. फिर्यादीनुसार, रुस्तुम, ज्ञानेश्वर आणि सूरज यांनी सुमितचे हातपाय पकडून ठेवले होते, तर रितेश बहिर याने त्याच्या हातातील धारदार चाकूने सुमितच्या पोटात वार केले. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि मदतीसाठी वाहन न मिळाल्याने सुमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
होमगार्डचा गुन्ह्यात सहभाग; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल









