'मिसिंग लिंक'चा मुहूर्त ठरला, टोलच्या दरवाढीबाबत महत्त्वाची माहिती, एकनाथ शिंदेंनी केली पाहणी

मुंबई तक

Pune News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग प्रकल्पाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख समोर आली आहे. 1 मे 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाईल. अशातच या प्रकल्पाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ADVERTISEMENT

pune news
pune news
google news

बातम्या हायलाइट

point

मिसिंग लिंकची एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

point

टोलच्या दरवाढीबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

पुण्याची गोष्ट : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची पाहणी केली असता, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 'ॲक्सेस कंट्रोल' पूर्णपणे लागू करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे. 1 मे 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाईल. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन प्रवास वेगवान होणार आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. 

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप, शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक

मिसिंग लिंकची एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

एकनाथ शिंदे यांनी 26 एप्रिल 2026 रोजी महामार्गाची पाहणी केली असता, त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती सांगितली.' स्वत: जाऊन कामाची गुणवत्ता तपासली असून झालेलं काम हे सामाधानकारक आहे. उर्वरित कामे पुढील काहीच दिवसांमध्ये पूर्ण होण्याची अधिक शक्यता आहे. उच्च दर्जाचे काम पुढील काहीच दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत'.  

या मिसिंग प्रकल्पासाठी 23.75 मीटरचा रुंद बोगदा आहे, तसेच हा रस्ता लोणावळा तलावाच्या 182 मीटर अंतर खालून जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हानाचीच बाब आहे. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच वाहतूक ही बायपास होणार असून प्रवासाचा जवळपास वेळ हा 20 ते 30 मिनिटांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. एवढेच नाही,तर अपघात शून्यावर येईल, असा ठाम दावा एकनाथ शिंदे यांनी केला. 

टोलच्या दरवाढीबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

हे वाचलं का?