देवेंद्र फडणवीसांचा फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप, शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक
Sharad Pawar group social media chief Mahadev Balgude arrested : पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मॉर्फ केलेला फोटो शेअर केल्याच्या आरोपाखाली शरद पवार गटाचे सोशल मीडिया प्रमुख महादेव बालगुडे यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीसांचा फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप
शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक
Sharad Pawar group social media chief Mahadev Balgude arrested, पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सोशल मीडिया राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना पोलिसांनी अटक केली असून, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गंभीर आरोप बालगुडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत बालगुडे यांना बेड्या ठोकल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांची बदनामी आणि नक्षलवाद्याचे उदात्तीकरण केल्याचा आरोप
महादेव बालगुडे यांच्यावर केवळ मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचाच नाही, तर नक्षलवादी विचारांच्या प्रसाराचाही गंभीर आरोप आहे. त्यांनी नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. एका जबाबदार पदावर असताना अशा प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मर्डर करुन मृतदेह जाळला अन् नंतर शेतात नेऊन पुरला, नुकतंच लग्न झालेल्या रुपासोबत काय घडलं?
वकिलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आणि पोलीस तपास
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका वकिलाने सायबर पोलिसांकडे धाव घेतल्याने झाली. संबंधित वकिलाने बालगुडे यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट निदर्शनास आणून देत लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करणे आणि देशविघातक शक्तींचे समर्थन करणे अशा मुद्द्यांवर भर दिला होता. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तत्परतेने महादेव बालगुडे यांना अटक केली. सध्या पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जात असून यामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेतला जात आहे.









