मर्डर करुन मृतदेह जाळला अन् नंतर शेतात नेऊन पुरला, नुकतंच लग्न झालेल्या रुपासोबत काय घडलं?
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि घटनेच्या तीन दिवसांनंतर गावातीलच एका शेतात जेसीबीने खोदकाम केले. यावेळी पोलिसांना जळालेल्या अवस्थेत रूपाचा मृतदेह सापडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मर्डर करुन मृतदेह जाळला अन् नंतर शेतात नेऊन पुरला
नुकतंच लग्न झालेल्या रुपासोबत काय घडलं?
Crime News : एका नवविवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रूपा असे मृत विवाहितेचे नाव असून, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रथम तिचा मृतदेह जाळला आणि त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने दहा फूट खोल खड्डा खोदून तो जमिनीत गाडून टाकला. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजली आहे. बिहारच्या नौबतपूर परिसरातील ही घटना आहे.
माहेरचे लोक पोहोचले अन् सासरचे झाले फरार..
रुपाचे प्रदुमन कुमार याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. रूपाच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 तारखेला रात्री 11 वाजता तिचे शेवटचे बोलणे झाले होते, ज्यामध्ये तिने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख केला होता. त्याच रात्री सासरच्यांनी रूपाने गळफास घेतल्याची माहिती फोनवरून दिली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नातेवाईक चेसी गावात पोहोचले, तेव्हा सासरची सर्व मंडळी फरार होती आणि रूपाचा कोणताही ठाकठिकाण नव्हता. संशय आल्याने नातेवाईकांनी नौबतपूर पोलीस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : कॉन्स्टेबलची प्रेयसी घरात घुसली अन् होत्याचं नव्हतं झालं, बायको आणि मुलाला संपवलं, चाकूने केले 32 वार
शेतात जेसीबीने खोदले अन्..
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि घटनेच्या तीन दिवसांनंतर गावातीलच एका शेतात जेसीबीने खोदकाम केले. यावेळी पोलिसांना जळालेल्या अवस्थेत रूपाचा मृतदेह सापडला. रूपाचा भाऊ धीरज कुमार याने आरोप केला आहे की, सासरच्यांनी पूर्वनियोजित कट रचून बहिणीची हत्या केली आणि पुरावा मिटवण्यासाठी अत्यंत क्रूरपणे मृतदेहाची विल्हेवाट लावली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
हे ही वाचा : डोंबिवलीत रिक्षांवर स्टिकर मोहीम, मनसेची आक्रमक भूमिका; परप्रांतीय रिक्षाचालकांना काय दिला इशारा?
सर्वच आरोपी फरार
पाटणा पश्चिमचे सिटी एसपी भानु प्रताप सिंह यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचे दिसत आहे. आरोपींनी हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून जमिनीत गाडला आहे. याप्रकरणी हुंडाबळी, संघटित गुन्हेगारी आणि पुरावे नष्ट केल्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस गांभीर्याने करत आहेत.









