दीड कोटी रुपयांसाठी बायकोचा खतरनाक प्लॅन, नवऱ्यासोबत काय केलं बघा..

मुंबई तक

योजनेनुसार 19 एप्रिल रोजी अन्नूने पती प्रदीपला तिची स्कूटी देऊन मुकेशसोबत काहीतरी कामाचे निमित्त करुन पाठवले. वाटेत ठरल्याप्रमाणे एका वाहनाने प्रदीपला जोरात धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

दीड कोटी रुपयांसाठी बायकोचा खतरनाक प्लॅन

point

नवऱ्यासोबत काय केलं बघा..

Crime News : दीड कोटी रुपयांची विम्याची रक्कम हडपण्यासाठी एका महिलेने आपल्या नवऱ्याला वाटेतून हटवण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अन्नू असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे प्रदीपला गाडीखाली चिरडून मारण्याचा कट रचला होता. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला नवरा सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत बायकोचा हा क्रूर डाव उधळून लावला आहे. हरियाणातील दादरी परिसरातील ही घटना आहे.

नवऱ्याला संपवण्यासाठी 'असा' रचला कट

या कटामागे बायकोचे प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याचे तपासात समोर आले आहे. अन्नूचे मुकेश नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी मिळून प्रदीपला संपवण्याची योजना आखली. विशेष म्हणजे, कट अंमलात आणण्यापूर्वी अन्नूने 23 फेब्रुवारी आणि 3 एप्रिल रोजी प्रदीपच्या नावाने प्रत्येकी 60 लाख रुपयांच्या दोन विमा पॉलिसी काढल्या होत्या. या विम्याच्या पैशांवर आणि मालमत्तेवर डोळा ठेवूनच या हत्येचा कट रचण्यात आला होता. यासाठी गुन्हेगारांना 20 लाख रुपयांची सुपारीही देण्यात आली होती.

हे ही वाचा : 37 वर्षीय घटस्फोटित पुरुषाला लग्नासाठी व्हर्जिन तरुणी हवी, मध्यस्ती करणाऱ्या महिलेनं सांगितला घटनाक्रम, Video व्हायरल

वहिणीच्या वागण्यावर संशय

योजनेनुसार 19 एप्रिल रोजी अन्नूने पती प्रदीपला तिची स्कूटी देऊन मुकेशसोबत काहीतरी कामाचे निमित्त करुन पाठवले. वाटेत ठरल्याप्रमाणे एका वाहनाने प्रदीपला जोरात धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर प्रदीपची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रदीपची बहीण सोनू हिला वहिनीच्या वागण्यावर संशय आला. अन्नूने अचानक काढलेली विम्याची पॉलिसी, जमिनीचा व्यवहार आणि वडिलोपार्जित जमिनीवर काढलेले कर्ज या गोष्टी सोनूने पोलिसांना सांगितल्या, ज्यामुळे तपासाची चक्रे वेगाने फिरली.

हे ही वाचा : 'बाळ, तू गप्प-गप्प का असतोस?' कारण कळताच वडील हादरले, आठवीच्या विद्यार्थ्यासोबत शाळेच्या स्वच्छतागृहात..

बायको झाली फरार

पोलिसांनी संशयावरून घटनेच्या वेळी सोबत असलेल्या मुकेशची कडक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी मुकेशला तात्काळ अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या कटात सामील असलेली मुख्य सूत्रधार पत्नी अन्नू आणि इतर तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विम्याच्या पैशांसाठी पोटच्या गोळ्यांच्या बापाचा जीव घेण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या या पत्नीच्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 

हे वाचलं का?