मुंबईची खबर : कर्मचाऱ्यांच्या संपानतर 'बेस्ट'ने घेतला मोठा निर्णय

मुंबई तक

कर्मचाऱ्यांच्या संपानंतर 'बेस्ट'ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याविषयीची रुपरेषा बीएमसीच्या स्थायी समोर मांडण्यात आली आहे. यावेळी बेस्टसंबंधीची विविध आकडेवारीदेखील समोर आली.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर

point

कर्मचाऱ्यांच्या संपानतर 'बेस्ट'चे तीन मोठे निर्णय

Mumbai News : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपानंतर बेस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन वर्षात 5000 बसेस आपल्या ताफ्यात समााविष्ट करण्यासाठी बेस्टने एक योजना आखली आहे. गुरुवारी (25 जून) बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बीएमसीच्या स्थायी समितीसमोर याविषयीची रुपरेषा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. भाडेतत्त्वावरील  बसेसवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. 

प्रलंबित देणी निकाली काढणार

यावेळी सेठी यांनी बेस्टच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. 31 मार्च 2026 पर्यंत बेस्टवरील एकूण दायित्व 23 हजार 296 कोटी रुपये इतके आहे. 2025-26 या वर्षात बेस्टच्या वीज विभागाला 115 कोटींचा नफा मिळाला. मात्र परिवहन विभागाला मोठा फटका बसला आहे. यावेळी त्यांनी प्रलंबित देण्यांबाबतही महत्त्वाची योजना मांडली. बेस्टच्या माजी कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युइटीची सुमारे 1,751 कोटी रुपयांची प्रलंबित देणी याच आर्थिक वर्षात निकाली काढण्याचे उद्दिष्ट बेस्टने ठेवले आहे. 

हे ही वाचा : मोठी बातमी : ठाण्यात TET चा पेपर फुटला, परीक्षा पुढे ढकलली, परिपत्रक जाहीर

स्मार्ट मीटर बसवण्याची योजना

यासोबतच तिकीट विक्रीव्यतिरिक्त इतर मार्गांनीही बेस्टचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामध्ये बसच्या पायाभूत सुविधांचा व्यावसायिक वापर, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, जाहिराती या मार्गांचा समावेश असणार आहे.  याशिवाय, वीज बिलिंग प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी, वितरणामधील नुकसान कमी करण्यासाठी आणि वीजचोरी रोखण्यासाठी वीज विभागामार्फत तब्बल 5,50,000 'स्मार्ट मीटर' बसवण्याची योजना देखील आखण्यात आली आहे.

हे ही वाचा : नागपूर : नवऱ्याला घटस्फोट दिला, अन् दुसऱ्याच दिवशी महिलेची हत्या, नेमकं काय घडलं?

मुंबईला किती बसेसची गरज?

यावेळी मुंबईला किती बसेसची गरज आहे, याचीही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या निकषांनुसार मुंबईला सध्या सुमारे 10 हजार बसेसची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

हे वाचलं का?