37 वर्षीय घटस्फोटित पुरुषाला लग्नासाठी व्हर्जिन तरुणी हवी, मध्यस्ती करणाऱ्या महिलेनं सांगितला घटनाक्रम, Video व्हायरल

मुंबई तक

Viral news : 37 वर्षीय घटस्फोटित आयआयटी पदवीधर जोडीदाराच्या शोधात ओएंद्रियाकडे आला होता. त्याचे प्रोफाइल उत्तम होते, पण त्याहून अपेक्षा चर्चेचा विषय बनल्या. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, त्याला 30 वर्षांखालील, अविवाहित किंवा तिचे याआधी कोणत्याही व्यक्तीशी नातेसंबंध नसलेली तरुणी विवाहासाठी अपेक्षित होती. 

ADVERTISEMENT

Viral news
Viral news
google news

बातम्या हायलाइट

point

37 वर्षीय घटस्फोटित तरुणाच्या अपेक्षा

point

तरुणी व्हर्जिन असावी अशी तरुणाची मागणी 

Viral News : विवाह हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनेकांना असा जीवनसाथी हवा असतो, ज्याच्यासोबत ती व्यक्ती आपलं सुखकर आयुष्य घालवू शकते. योग्य जोडीदार मिळणे हे सोपे नसते, पण काहींना प्रेम मिळते आणि नंतर ते लग्नापर्यंत पोहोचते. अनेकांसाठी हा प्रवास इतका सरळ नसतो, अशा स्थितीत मध्यस्ती लग्नासाठी योग्य जोडीदार मिळवून देतात. लग्नासाठी स्थळ जुळवून देणाऱ्या एका ओएंद्रिया कपूर नावाच्या महिलेनं सोशल मीडियावर एक अनुभव शेअर केला. 

हे ही वाचा : सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..

या पोस्टमध्ये तिने एका आयटी क्षेत्रात पदवीधर असणाऱ्या घटस्फोटित तरुणाच्या मागणीचे वर्णन केले, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला. भारतात आयआयटी पदवीधरांना एक विशेष दर्जा प्राप्त असल्याचे मानले जाते. हा दर्जा अनेकदा नातेसंबंध जुळवताना महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, या प्रकरणात समोर आलेल्या अटींना लोकांना आश्चर्यचकित केले. 

37 वर्षीय घटस्फोटित तरुणाच्या अपेक्षा

कपूर यांच्या म्हणण्यांनुसार, 37 वर्षीय घटस्फोटित आयआयटी पदवीधर जोडीदाराच्या शोधात ओएंद्रियाकडे आला होता. त्याचे प्रोफाइल उत्तम होते, पण त्याहून अपेक्षा चर्चेचा विषय बनल्या. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, त्याला 30 वर्षांखालील, अविवाहित किंवा तिचे याआधी कोणत्याही व्यक्तीशी नातेसंबंध नसलेली तरुणी विवाहासाठी अपेक्षित होती. 

तरुणी व्हर्जिन असावी अशी तरुणाची मागणी 

ओएंद्रिया कपूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, तरुणीचा कोणताही भूतकाळ नसावा, तसेच ती व्हर्जिन असावी. याचा अर्थ त्या तरुणीचे यापूर्वीचे नातेसंबंध किंवा जोडीदार नसावा. तसेच ती तरुणी ब्राह्मण समाजातील असावी, असा त्यांचा आग्रह होता. विशेष म्हणून तो तरुण स्वत: घटस्फोटित असून त्यांनी काही अटींवर तडजोड केली जाणार नाही असं जाहीर केले. 

हे वाचलं का?