सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. पोल पंडित या संस्थेकडून हा एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित
राहुरीत काय होणार?
काय सांगतो एक्झिट पोल?
Maharashtra By Elections Exit Poll : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. यानुसार या दोन्ही जागांवर महायुती विजयी होताना दिसत आहे. पोल पंडित या संस्थेकडून हा एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या दोन्ही जागी पोटनिवडणूक लागली होती. मतदारांची सहानुभूती, महायुतीतील नेत्यांचा सक्रिय सहभाग आणि सक्षम विरोधी उमेदवाराचा अभाव यामुळे या दोनही जागा महायुतीच्या पारड्यात गेल्याचे या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बारामती पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिकामी झाली होती. या जागी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. पोल पंडित या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, सुनेत्रा पवार 1 लाख 90 हजार ते 2 लाख मताधिक्याने विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल असणारी सहानुभूती, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची प्रचारात असणारी सक्रियता आणि सक्षम विरोधी उमेदवाराचा अभाव यामुळे सदर निवडणुकीस एकतर्फी स्वरूप प्राप्त झाल्याचे या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत 58 टक्के मतदान झाले असून यापैकी 85 ते 90 टक्के मतं सुनेत्रा पवार यांना मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : उल्हासनगर : विरोधी पक्षनेता निवडीवरुन भाजप नगरसेवकांचा राडा, महापालिकेत शिवसेना–भाजप युती तुटण्याच्या मार्गावर?
राहुरी पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिकामी झाली होती. या जागी भाजपकडून अक्षय कर्डिले यांनी निवडणूक लढवली. पोल पंडित या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, अक्षय कर्डिले हे 95 हजार ते 1 लाख 5 हजार मतांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.









