उल्हासनगर : विरोधी पक्षनेता निवडीवरुन भाजप नगरसेवकांचा राडा, महापालिकेत शिवसेना–भाजप युती तुटण्याच्या मार्गावर?

मिथिलेश गुप्ता

भाजपाने या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. तसेच शिवसेना युती धर्म पाळत नसून भाजपाला विश्वासात घेत नाही, असा आरोप करण्यात आला.

ADVERTISEMENT

 उल्हासनगर महानगरपालिका
उल्हासनगर महानगरपालिका
Google CTA

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगर : विरोधी पक्षनेता निवडीवरुन भाजप नगरसेवकांचा राडा

point

महापालिकेत शिवसेना–भाजप युती तुटण्याच्या मार्गावर?

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामधील वाद चिघळला असून, सत्तेत असलेली महायुती तुटण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीवरून महासभेत अभूतपूर्व गोंधळ आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.

काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका विरोधा पक्षनेते पदी

महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी अचानक काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अंजली साळवे यांची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली. 78 सदस्यीय सभागृहात या निर्णयाला भाजपाने जोरदार विरोध केला. गोंधळ वाढत असतानाच महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा तहकूब केली. त्यामुळे भाजप संतप्त झाली आहे. महापौरांचे मनमानी कारभार सुरू असून युती धर्म पाळला जात नाही तसेच निर्णय एकतर्फी घेतल्याचे भाजपने आरोप केले आहेत. 

हे ही वाचा : 'माझ्या मृतदेहाला वडिलांनी स्पर्श सुद्धा करु नये', वकिलाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय?

युती धर्म विरोधी निर्णय

भाजपाने या निर्णयाला 'युती धर्म' विरोधी ठरवत शिवसेनेवर एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केला. गटनेते राजेश वधारिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, एका नगरसेवकाच्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद देणे नियमबाह्य असून या पदावर भाजपाचा हक्क होता. तसेच हा विषय अचानक सभेत आणून भाजपाला आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्याचा आरोपही करण्यात आला.

दरम्यान, महासभेनंतर आयुक्त मनीषा आव्हाले यांच्या दालनाबाहेर मोठा राडा झाला. भाजप नगरसेवकांना दालनात जाण्यापासून सुरक्षा रक्षकांनी रोखले, तर दुसरीकडे शिवसेना गटनेते अरुण आशण आणि महापौरांचे पती कमलेश निकम यांना आत प्रवेश देण्यात आला. महापौरांच्या पतीला कोणतेही अधिकृत पद नसताना त्यांना प्रवेश देण्यात आल्यामुळे भाजप नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.