'माझ्या मृतदेहाला वडिलांनी स्पर्श सुद्धा करु नये', वकिलाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय?
Lawyer priyanshu srivastava suicide case : 25 वर्षीय वकील प्रियांशु श्रीवास्तव यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. वडिलांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमधून समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'माझ्या मृतदेहाला वडिलांनी स्पर्श सुद्धा करु नये',
वकिलाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय?
Lawyer priyanshu srivastava suicide case : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रियांशु श्रीवास्तव या 25 वर्षीय तरुण वकीलाने न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. प्रियांशुने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर एक सविस्तर सुसाईड नोट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी स्वतःच्या वडिलांना जबाबदार धरले आहे. या घटनेने कानपूरच्या कोर्ट परिसरात मोठी खळबळ उडाली असून, एका उमद्या वकीलाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या स्टेटसने सर्वांनाच हादरवून सोडले असून, त्यातील मजकूर वडिलांच्या कठोर वर्तणुकीवर बोट ठेवणारा आहे.
लहानपणापासूनची मानसिक त्रास आणि वडिलांची अवाजवी शिस्त
प्रियांशुने आपल्या दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये बालपणापासून सोसलेल्या वेदनांचा पाढा वाचला आहे. त्याने आरोप केला आहे की, त्याचे वडील राजेंद्र कुमार श्रीवास्तव यांचे वागणे त्याच्याशी अत्यंत कठोर आणि अमानवीय होते. एका घटनेचा उल्लेख करताना त्याने लिहिले की, लहानपणी फ्रिजमधील आंब्याचा रस पिण्यासारख्या शुल्लक कारणावरून वडिलांनी त्याला विवस्त्र करून घराबाहेर काढले होते. प्रियांशुच्या मते, हा मानसिक छळ केवळ लहानपणापुरता मर्यादित नव्हता, तर तो वकील झाल्यानंतरही सुरूच होता. अभ्यासात संघर्ष करावा लागला तरी वडिलांकडून सहानुभूतीऐवजी केवळ कठोरपणाच वाट्याला आल्याचे त्याने या चिठ्ठीत नमूद केले आहे, ज्यामुळे त्याच्या मनात वडिलांबद्दल मोठी भीती आणि कटुता निर्माण झाली होती.
स्वतःच्या चेंबरमध्ये सन्मान नाही; स्वाभिमानाला पोहोचली ठेच
वकील असूनही प्रियांशुला स्वतःची कोणतीही स्वतंत्र ओळख निर्माण करता आली नव्हती. तो आपल्या वडिलांच्याच चेंबरमध्ये काम करत असे, जिथे त्याला साधा सन्मान किंवा स्वतःची जागाही उपलब्ध नव्हती. दिवसभर वडिलांच्या सेवेत आणि कामात व्यग्र राहूनही प्रियांशु नैराश्यात गेला. सुसाईड नोटमध्ये त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की, तो कधीही चुकीच्या संगतीत पडला नाही किंवा त्याने कोणतेही व्यसन केले नाही, तरीही वडिलांच्या अवाजवी शिस्तीने आणि वागणुकीने त्याचा स्वाभिमान पूर्णपणे चिरडून टाकला होता. या मानसिक कोंडीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न सापडल्याने अखेर त्याने मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, 'माझ्या मृतदेहाला वडिलांनी हात लावू नये' अशी शेवटची इच्छा त्याने व्यक्त केल्याने त्याचे वडील राजेंद्र कुमार पूर्णपणे कोलमडून गेले आहेत.
पोलिसांचा तपास आणि बार असोसिएशनची भूमिका









