घरात घुसून प्रसिद्ध युट्यूबरची हत्या, मेहुणा फरार; बायकोसोबत..

मुंबई तक

एका प्रसिद्ध युट्यूबरच्या हत्येनं खळबळ माजली आहे. त्याच्या मेहुण्यानेच त्याची हत्या केली. यामागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

घरात घुसून प्रसिद्ध युट्यूबरची हत्या

point

मेहुणा फरार

point

बायकोसोबत..

Crime News : एका 25 वर्षीय जिम ट्रेनर आणि युट्यूबरची त्याच्याच मेहुण्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (12 जून) संध्याकाळी घडली. एस.के. मेहबूब उर्फ मसूद चंदी असे मृताचे नाव असून तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. मसूद चंदी या नावाने त्याचे युट्यूब चॅनल होते, ज्यावर त्याचे हजारो फॉलोअर्स होते. या प्रकरणी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. तेलंगणातील गोवळकोंडा परिसरातील ही घटना आहे.

लोखंडी रॉडने हल्ला 

घटनेच्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास मेहबूबचा मेहुणा एस.के. सोहेल हा त्याचे साथीदार अफू आणि जाबेर यांच्यासह कुम्मारवाडी येथील मेहबूबच्या घरी पोहोचला. तिथे त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लोखंडी रॉडने मेहबूबवर भीषण हल्ला केला. गोवळकोंडा विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त कृष्णा गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मेहबूबचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याचा राग, विकृत भावाने 44 दिवसात बहिणीला संपवलं!

प्रेमविवाह आणि वाद

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मेहबूबने 18 महिन्यांपूर्वी गोवळकोंडा येथील बडा बाजार भागातील सलमा बेगमसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना सहा महिन्यांचा मुलगाही आहे. मात्र, या विवाहामुळे दोन्ही कुटुंबे नाराज होती. गेल्या काही काळापासून मेहबूब आणि सलमा यांच्यातील वैवाहिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मेहबूब आपल्या पत्नीला नीट वागणूक देत नसल्याचा आरोप सासरच्या मंडळींकडून केला जात होता. याच वादातून सोमवारी मेहबूबने सलमा आणि मुलाला तिच्या माहेरी पाठवून दिले होते.

हे ही वाचा : घराला रंगकाम करण्यासाठी आले, महिलेला एकटं पाहून नको तेच अन्..

मेहुणा साथीदारासह फरार

मुलीला मिळत असलेल्या वागणुकीमुळे सोहेल आणि त्याचे कुटुंबीय मेहबूबवर प्रचंड रागावले होते. याच रागाचा बदला घेण्यासाठी सोहेल आपल्या मित्रांसह मेहबूबच्या घरी जाब विचारण्यासाठी गेला होता, जिथे रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

हे वाचलं का?