मुलीला बॉयफ्रेंडसोबत रहायचं होतं, वडिलांनी काय केलं बघा...
एका वडिलांनी आपल्या 19 वर्षीय मुलीवर पोलिसांसमोरच चाकूने वार केले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला. वडिलांनी हे पाऊल का उचललं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीला बॉयफ्रेंडसोबत रहायचं होतं
वडिलांनी काय केलं बघा...
Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्याच 19 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत राहण्याच्या हट्टावर ठाम होती. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आणि कुटुंबातील सदस्य तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाच, रागाच्या भरात वडिलांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील आहे.
शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणीचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, 18 मे रोजी ती आपल्या प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून तरुणीचा शोध सुरू केला होता. पोलीस सातत्याने तिच्या शोधात होते आणि अखेर 12 जून रोजी पोलिसांनी या तरुणीला सुखरूप शोधून काढले.
हे ही वाचा : एक 26 वर्षीय कबड्डीपटू अन् 25 हल्लेखोर, कुणी कुणाला संपवलं?
'मला त्याच्यासोबतच रहायचंय'
तरुणीचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि चर्चेच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांसमोरच तरुणीने आपल्या प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. तिने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्नही केले होते आणि आता ती त्याच्यासोबतच संसार करण्याच्या हट्टावर ठाम होती. पोलीस आणि कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकण्यास तयार नव्हती. याच वादादरम्यान वडिलांनी चाकू काढून तरुणीच्या पोटावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
हे ही वाचा : धाराशिव : सरकारी कर्मचाऱ्याला 'लुटेरी दुल्हन'ने 27 लाखांना लुटले, कसं टाकलं जाळं?
समुपदेशन सुरु असतानाच...
या दुर्दैवी घटनेनंतर मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले असून आरोपीला अटक केली आहे. त्याला तुरुंगात पाठवण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टम पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, 18 मे रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती. 12 जून रोजी तिला सुखरूप आणून समुपदेशन सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.









