धाराशिव : सरकारी कर्मचाऱ्याला 'लुटेरी दुल्हन'ने 27 लाखांना लुटले, कसं टाकलं जाळं?

मुंबई तक

लग्नाच्या अवघ्या एकाच महिन्यात पत्नीने पतीची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नववधू तब्बल 17 तोळे सोने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले आहे.

ADVERTISEMENT

Dharashiv Crime
Dharashiv Crime
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : लग्न केलं अन् फसला,

point

सरकारी कर्मचाऱ्याला 'लुटेरी दुल्हन'ने लुटले

point

कसं टाकलं जाळं?

Dharashiv Crime, गणेश जाधव : धाराशिव शहरातील भाग्यानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न होऊन अवघे 30 दिवस होत नाहीत तोच, एका नववधूने आपल्या साथीदारांच्या मदतीने पतीच्या घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले आहे. याप्रकरणी पीडित पती शिवराज (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आनंदनगर पोलिस ठाण्यात पत्नीसह एकूण नऊ जणांविरुद्ध फसवणूक, चोरी आणि खंडणीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अशी फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.

'आम्ही तिला समजावतो'

मूळचे नांदेड जिल्ह्यातील असलेले शिवराज सध्या धाराशिव येथील शासकीय निवासस्थानात राहतात. त्यांचे लग्न 13 मे रोजी तेलंगणामधील बोधन येथील शुभांगी ऊर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले हिच्याशी झाले. मात्र, लग्नानंतर शुभांगी पतीसोबत नीट वागत नव्हती. यामुळे त्रस्त झालेल्या शिवराज यांनी ही माहिती लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थांना आणि पत्नीच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर गुरुवारी (11 जून) शुभांगीचे नातेवाईक घरात आले आणि तिला समजावून सांगण्याचे नाटक करून, 'आम्ही हिला समजावून परत पाठवतो' असे सांगत तिला सोबत घेऊन निघून गेले.

हे ही वाचा : राजघराण्यातील सवतींमध्ये वाद, एकीने रायफल काढली अन्...; धक्कादायक प्रकरण

चोरी, धमकी अन् खंडणी

ते सर्वजण निघून गेल्यानंतर शिवराज पाटील यांच्या लक्षात आले की, घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 27 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब आहे. त्यांनी तातडीने पत्नीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. परंतु, चोरी केल्यानंतरही आरोपींचे समाधान झाले नाही. शिवराज हे शासकीय पदावर कार्यरत असल्याचा फायदा उठवत, आरोपींनी त्यांची समाजात बदनामी करण्याची आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ही बदनामी टाळण्यासाठी आरोपींनी थेट 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत त्यांना मानसिक त्रास दिला.

हे ही वाचा : सलून चालकाच्या प्रेमात वेडी झाली नर्स, शेवटी सडलेला मृतदेह आढळला, काय घडलं?

विसरलेल्या मोबाईलमुळे फसवणूक उघड

या संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश घरात विसरलेल्या एका मोबाईलमुळे झाला. सर्व पाहुणे पत्नीला घेऊन गेल्यानंतर, बेडरूममधील बेडवर उशाखाली एक मोबाईल फोन सापडला. शिवराज यांनी तो मोबाईल उघडून पाहिला असता, त्यात संबंधित नववधूचे इतर मुलांसोबत लग्न झाल्याचे फोटो आणि विवाहासंबंधीचे चॅटिंग आढळून आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी 11 जून रोजी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस या टोळीचा पुढील तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?