नराधम आजोबाची नातीवर वाईट नजर, अश्लील व्हिडिओ दाखवून..

मुंबई तक

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार घटना उघडकीस आला. आजोबानेच आपल्या नातीवर वाईट नजर ठेवून तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले. नराधम एवढ्यावरच न थांबता त्याने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून चुकीची वागणूक दिली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नराधम आजोबाची नातीवर वाईट नजर 

point

पीडितेला झोपेत उठवून नको तेच...

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार घटना उघडकीस आला. आजोबानेच आपल्या नातीवर वाईट नजर ठेवून तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले. नराधम एवढ्यावरच न थांबता त्याने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून चुकीची वागणूक दिली. संबंधित आजोबा हा 60 वर्षांचा नराधम आहे. या घटनेनं नात्याला काळिमा फासली गेली आहे. 

हे ही वाचा : नागपूर: पिकनिकला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू, बापासह लेकाचा समावेश

नराधम आजोबाची नातीवर वाईट नजर 

नराधम आजोबा एवढ्यावरच थांबला नाही,तर त्याने पीडितेला सांगितलं की, 'तु आता मोठी होत आहेस'. अश्लील व्हिडिओ दाखवून असंच काही तरी शिक अशी चुकीची शिकवण देत होता. त्याने अनेकदा चिमुकली चुकीचा स्पर्श देखील केला. परिस्थिती लक्षात घेत पीडितेनं आपल्या आईला याबाबतची माहिती दिली. 

पीडितेला झोपेत उठवून नको तेच...

पीडितेनं सांगितलं की, ग्वालियरचे आजोबा तिच्याशी चुकीचं वागतात. पीडित मुलीनं पुढे सांगितलं की, घरात रात्री सर्व झोपलेले असताना, आजोबा दारू पिऊन मला झोपेतून उठवायचा आणि नंतर जबरदस्ती करायचा. नंतर टी शर्टमध्ये हात टाकून चुकीचं वर्तन करायचा.  

हे ही वाचा : सोलापूर : सख्ख्या काकानेच 5 वर्षाच्या पुतण्याला संपवलं, असं फुटलं बिंग

भास्करच्या माहितीनुसार, पीडितेच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. पीडितेचे वडील हे ग्वालियरमध्ये कौटुंबिक व्यवसाय चालवतात. तसेच आई ही गुजरातमध्ये ज्योतिषशास्त्राचं काम करते. मार्च 2026 मध्ये शाळेच्या सुट्टीनंतर आई आपल्या मुलीला सूरतला घेऊन गेली. मुलगी भयभीत पाहून तिने मुलीला विचारलं असता, पीडित मुलगी रडू लागली. मुलीनं आपल्या मनातील सल ऐकवून दाखवल्यानंतर आई हादरून गेली, नंतर तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. ग्वालियर पोलिसांनी एफआरआय दाखल केली, मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?