नागपूर: पिकनिकला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू, बापासह लेकाचा समावेश
Nagpur News : नागपूर ग्रामीण विभागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पिकनिकचा आनंद घ्यायला गेलेल्या 3 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. हा धक्कादायक प्रकार नागपूरच्या ग्रामीण विभागातील कन्हान नदीच्या महगादेव घाट परिसरात घडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पिकनिकला गेलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Nagpur News : नागपूर ग्रामीण विभागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पिकनिकचा आनंद घ्यायला गेलेल्या 3 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. हा धक्कादायक प्रकार नागपूरच्या ग्रामीण विभागातील कन्हान नदीच्या महगादेव घाट परिसरात घडला. बाप लेकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं घटनास्थळावरील परिसरात एकच शोक व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : सोलापूर : सख्ख्या काकानेच 5 वर्षाच्या पुतण्याला संपवलं, असं फुटलं बिंग
पिकनिकला गेलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख रोहित कैलास नागदेवे (वय 33), गौतम राजकुमार अंबादे (वय 31) आणि मुलगा चैतन्य गौतम अंबादे (वय 6) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुलाला पाण्यात बुडताना वडील गौतम अंबादे यांनी पाहिलं असता, रोहित नागदेवे त्या मुलाला वाचवण्यासाठी नदीत उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले.
हे ही वाचा : तरुणाने आईवर चाकूने हल्ला केला, नंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारत..
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नातून तिघांनाही नदीतून बाहेर काढण्यात आले. मात्र तोवर खूपच उशिर झाला होता. तोवर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांसह अख्ख्या गावाने शोक व्यक्त केला आहे. पोलिसांनी हे अकस्मात निधन असल्याचे सांगत, प्रकरण तपास सुरू ठेवला आहे.









