तरुणाने आईवर चाकूने हल्ला केला, नंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारत..

मुंबई तक

Crime News : एका तरुणाने कथितरित्या आपल्या आईवर चाकूने हल्ला केला, नंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर त्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने कथितरित्या आईवर चाकूने हल्ला केला

point

तरुणाची पाचव्या मजल्यावरून उडी

Crime News : ग्रेटर नोएडातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने कथितरित्या आपल्या आईवर चाकूने हल्ला केला, नंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर त्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : बारामती : टेम्पोनं स्कूटरला 150 फूट फरफटत नेलं, भीषण अपघातात 3 भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

तरुणाने कथितरित्या आईवर चाकूने हल्ला केला

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सागर यादव (वय 21) अशी ओळख समोर आली. तो ग्रेटर नोएडा येथील बिसरख पोलीस ठाणे परिसरातील राधा स्काई गार्डनर सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत राहत होता. कुटुंबात आई-वडील आणि छोटा भावाचा देखील समावेश आहे. प्राथमिक तपासातून समोर आले की, सागर यादव आणि त्याच्या आईत मोठा वाद झाला. याचदरम्यान तरुणाने कथितरित्या चाकूने आपल्या आईवर हल्ला केला, ज्यात ती जखमी झाली. 

तरुणाची पाचव्या मजल्यावरून उडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईला जखमी करून सागर यादवने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेनं सोसायटीत एकच खळबळ उडाली. उडी मारल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. तरुणाची गंभीर परिस्थिती पाहून तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरुणाचं जीवन वाचवता आलं नाही. 

या भीषण अपघातात आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तिच्यावर उपचार सुरू आहेत. बिसरख ठाणे पोलिसांचं म्हणणं आहे की, कुटुंबीयांनी सांगितलं की, सागर यादवचं मानसिक रुप अस्वस्थ आहे. याच कारणाने त्याच्या वागणुकीतून असामान्यता दिसून आली होती. पोलिसांनी सांगितलं की, आई आणि मुलात झालेल्या वादानंतर शनिवारी ही घटना घडली आहे. याच वादाच्या मूळ कारणाबाबत तपशील गोळा करण्यात आले. 

हे वाचलं का?