ठाकरेंचा एक खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा, मातोश्रीवर हालचाली वाढल्या
Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावली शिवसेना (UBT) खासदारांची तातडीची बैठक.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाकरेंचा एक खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा
मातोश्रीवर हालचाली वाढल्या
Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी तातडीने पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबईतील ठाकरे कुटुंबीयांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे पार पडणार आहे. पक्षाच्या वतीने याला केवळ एक सामान्य आढावा बैठक असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय वर्तुळात या बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे नॉट रिचेबल असल्याची चर्चा असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.
हेही वाचा : वाशिम : नवऱ्याची बॉडी टॉवरला लटकलेली, तर बायको अन् दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत
'ऑपरेशन टायगर'चे दावे दोन्ही गटांनी फेटाळले
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे काही नेते आणि खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, ज्या खासदारांची नावे या संदर्भात घेतली जात आहेत, त्यांनी पक्ष सोडल्याचा किंवा गट बदलल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षांमधील अंतर्गत कुरघोडीच्या बातम्यांमुळे उद्धव ठाकरे यांची ही बैठक संघटनात्मक एकजूट दाखवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा : दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याचा राग, विकृत भावाने 44 दिवसात बहिणीला संपवलं!










