कॉक्रोच जनता पार्टी: अभिजीत दिपकेला पुण्यात कोणी दिला सल्ला? आंदोलनाआधी CJP ची नवी चाल
पुण्यात अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या Cockroach Janta Party च्या आंदोलनाची सध्या राज्यभर चर्चा आहे. याच पक्षाने आज पुण्यात आंदोलन केलं. पण त्या आंदोलनाआधी त्यांनी नेमकी कोणाशी चर्चा केली जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजीत दिपके यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आणि पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. मात्र, या पत्रकार परिषदेपूर्वी अभिजीत दिपके यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट झाली होती. त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत दोघांनीही सविस्तर माहिती दिली.
विश्वंभर चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी आणि असीम सरोदे यांनी अभिजीत दिपके यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम त्यांनी गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भेट म्हणून दिला. त्यामागचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, कोणतेही आंदोलन यशस्वी व्हायचे असेल तर त्याचा पाया शांतता आणि अहिंसा या मूल्यांवर आधारित असला पाहिजे.
त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा सल्ला दिला. आंदोलनाची कार्यकारिणी आणि नेतृत्व शक्यतो ३५ वर्षांखालील तरुणांच्या हाती असावे, असे त्यांनी सांगितले. नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि बदलाची इच्छा असलेली पिढीच समाजात परिवर्तन घडवू शकते, असे त्यांचे मत होते. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यासारख्या ज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावावी, मात्र आंदोलनाचे चेहरे आणि नेतृत्व तरुणांचेच असावे.
हे ही वाचा>> उद्धव ठाकरे आक्रमक, कॉकरोच जनता पार्टीवरुन सरकारला निर्वाणीचा इशारा
"आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी आहोत. ही मुलं चांगलं काम करतील, त्यांना संधी दिली पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आंदोलनं जिवंत राहिली पाहिजेत आणि त्यासाठी पुढची पिढी तयार झाली पाहिजे," असे विश्वंभर चौधरी म्हणाले.









