3 वर्षाच्या मुलीला बिस्कीटाचं आमिष दाखवलं, नंतर पळवून नेलं अन्..
Crime News : एका तीन वर्षाच्या मुलीवर कथितरित्या लैंगिक अत्याचार आणि नंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. एका झुडूपात ही मुलगी अगदी गंभीर अवस्थेत आढळून आली होती. परिस्थिती बघता तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आरोपीने मुलीला बिस्किटांचे आमिष दाखवून पळवून नेले
आरोपीविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Crime News : तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात एका तीन वर्षाच्या मुलीवर कथितरित्या लैंगिक अत्याचार आणि नंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. एका झुडूपात ही मुलगी अगदी गंभीर अवस्थेत आढळून आली होती. परिस्थिती बघता तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात नेण्यासाठी विलंब झाला होता, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : भिवंडी: बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे 'तसले' व्हिडिओ रेकॉर्ड केले अन्..
आरोपीने मुलीला बिस्किटांचे आमिष दाखवून पळवून नेले
या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील स्थलांतरित मजुराला अटक केली. प्राथमिक तपासातून असे समोर आले की, आरोपी आणि मुलीचे कुटुंब एकमेकांच्या ओळखीचे आहेत. याचाच गैरफायदा घेत आरोपीने मुलीला बिस्किटांचे आमिष दाखवून तिला पळवून नेले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला त्याच्याच काही वेळेआधी मुलगी घराजवळ खेळत होती. नंतर थोड्याच वेळानंतर मुलगी अचानकपणे घटनास्थळावरून गायब झाली. मुलीचा शोध घेताच महिलेला ती झुडुपांमध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिने तात्काळपणे स्थानिकांना माहिती दिली आणि मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र तिचा जीव वाचला नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार, घटनेनं परिसर संतापला आहे. जमावाने आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. याच घटनेची माहिती मिळताच परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.









