वसई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गळ्याला दोर लावला, नेमकं कारण काय?

मुंबई तक

tv actress sanchita ugale dies by suicide : वसईतील नालासोपारा येथे टीव्ही अभिनेत्री संचिता उगाले हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

tv actress sanchita ugale dies by suicide
tv actress sanchita ugale dies by suicide
google news

बातम्या हायलाइट

point

वसई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गळ्याला दोर लावला

point

नेमकं कारण काय?

TV actress sanchita ugale dies by suicide : वसईतील नालासोपारा परिसरातून एक अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे. हिंदी टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत असलेल्या अभिनेत्री संचिता उगाले हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. संचिताने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : 'मी भवानीला मारुन टाकलं', एक कॉल आला अन् बॉयफ्रेंडही बेशुद्ध अवस्थेत तिथेच सापडला

अभिनेत्रीने आत्महत्या कशामुळे केली? पोलिसांकडून होणार चौकशी 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आचोले पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संचिताचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमसाठी (शवविच्छेदन) पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. संचिताने नक्की कोणत्या परिस्थितीमुळे किंवा मानसिक दबावामुळे हे पाऊल उचलले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस चौकशी करणार आहेत.

हेही वाचा : मातोश्रीवरील बैठकीतून बाहेर पडताच संजय दिना पाटलांचं मोठं वक्तव्य

हे वाचलं का?