भिवंडी: बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे 'तसले' व्हिडिओ रेकॉर्ड केले अन्..

मुंबई तक

Thane crime : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका व्यक्तीवर बाथरूमच्या खिडकीतून दोन महिलांचे गुपचूपपणे अश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. पोलिसांनी एफआरआय दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. मात्र, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

बाथरूममधील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले

point

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका व्यक्तीवर बाथरूमच्या खिडकीतून दोन महिलांचे गुपचूपपणे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. पोलिसांनी एफआरआय दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. मात्र, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे भवितव्य उजळणार

पोलिसांच्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 8 जून रोजी रात्री उशिरा सारंग गावातील एका बंगल्यात घडल्याचं वृत्त आहे. घरात उपस्थित असलेल्या एका 16 वर्षीय मुलीने संशयित आरोपीने व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. नंतर पीडितेनं पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. 

बाथरूममधील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले

तक्रारीनुसार, त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने, आपला मोबाईल फोन बाथरूमच्या खिडकीला काठीचा आधार घेत टेकवून उभा केला आणि किशोरवयीन मुलीची आई आणि मावशीचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. 

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल केला. शिवाय तक्रारदार ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?