पांढऱ्या पट्टीचा वाद: 'निलेश चंद्रांनी चंद्रावर राहावं, धर्म घरात..' मनसे नेता प्रचंड चिडला!

राहुल गायकवाड

घाटकोपरनंतर दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याने मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक झाले. हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं देशपांडे म्हणाले.

ADVERTISEMENT

sandeep deshpande interview dispute over white strip in dadar nilesh chandra should live on moon mns leader sandeep deshpande is furious
मनसेचा कोणाला इशारा?
google news

मुंबई: पांढऱ्या पट्टीचा वाद आता दादरपर्यंत येऊन पोहोचला आहे. दादरमधील एका जैन मंदिराबाहेर पांढरी पट्टी मारण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून इशारा देण्यात आला होता की दुपारी तीन वाजेपर्यंत ही पट्टी हटवली नाही तर पक्ष आपल्या पद्धतीने उत्तर देईल. त्यानंतर बीएमसी आणि संबंधित यंत्रणांनी ती पट्टी हटवून त्या ठिकाणी वेगळा रंग दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत मनसेची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला.

मनसेचे संदीप देशपांडे संतापले

यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, "आमचा पांढऱ्या रंगाला विरोध नाही. विरोध या गोष्टीला आहे की हा सार्वजनिक रस्ता आहे. उद्या कोणाला वाटेल हिरवी पट्टी मारावी, कोणाला वाटेल पिवळी पट्टी मारावी, तर कोणाला भगवी पट्टी मारावी. सार्वजनिक मालमत्ता ही सर्वांची असते, कोणाच्या एकट्याच्या मालकीची नसते. त्यामुळे तिचा वापर सार्वजनिक हितासाठी आणि नियमांनुसारच झाला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा एका धर्माच्या इच्छेनुसार सार्वजनिक जागेचा वापर होऊ शकत नाही. आमचा आक्षेप या नियमबाह्य प्रकाराला आहे."

हे ही वाचा>> जैन मुनींसाठी पांढरी पट्टी, वाद विकोपाला; दोन्ही पक्ष समोरासमोर, पाहा व्हिडीओ

जैन समाजातील काही प्रतिनिधींनी मनसेच्या भूमिकेवर टीका केली असून, त्यामध्ये निलेशचंद्र मुनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले, "मी जे बोलतोय ते या देशाचा कायदा सांगतो. बाकी कुणी शहाणपणा करण्याची गरज नाही. मुंबईत राहायचे असेल तर इथले नियम आणि कायदे पाळावे लागतील."

हे वाचलं का?