दोघांचा खून, शेतात महिला अर्धनग्नअवस्थेत तर तरुणावर गोळीबार; अंगावर काटा आणणारा घटनेचा थरार
Crime News : जिल्ह्याच्या अमरापूर ठाणे क्षेत्रातील शेतात एका महिलेचा मृतदेह अर्धनग्नवस्थेत आढळून आला होता. ही घटना रामपुर मांझी बाजार परिसरात घडली आहे. महिलेचा मृतदेह नागरिकांना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेतात महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न
सकाळी सकाळी आढळले दोन मृतदेह
Crime News : बिहारच्या बांका जिल्ह्यात ठाणे क्षेत्रात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्याच्या अमरापूर ठाणे क्षेत्रातील शेतात एका महिलेचा मृतदेह अर्धनग्नवस्थेत आढळून आला होता. ही घटना रामपुर मांझी बाजार परिसरात घडली आहे. महिलेचा मृतदेह नागरिकांना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अमरपुर ठाणे पोलिसांनी मृतदेह जप्त केला.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणार..इतक्यात पोलीस जीव तोडून धावले; कोल्हापुरात तुफान राडा VIDEO
शेतात महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न
मृतदेह छिन्नविछिन्न झाला असता, ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती मिळवली आणि या घटनेचा एकूण तपास करण्यात आला होता. अशातच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर महिलेच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले.
अज्ञात तरुणावर गोळीबार
बांका जिल्ह्याच्या अमरपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील डटबाटी गावानजीक रविवारी रात्री एका अज्ञात तरुणावर गोळीबार करत हत्या केली. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळी स्थानिक लोकांनी रस्त्यानजीक तरुणाचा मृतदेह पाहिला आणि मृतदेहाला ताब्यात घेतले नंतर तपास सुरु केला.
हे ही वाचा : मुंबई हादरली, आधी बिर्याणी अन् झोपताना सर्वांनी कलिंगड खाल्लं, सकाळी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, काय घडलं?
दरम्यान, मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे सांगण्यात येत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी मृतकाच्या खिशातून चाकू, तसेच काही गाड्यांच्या चाव्या ताब्यात घेतल्या. हे प्रकरण गुन्हेगारी कृत्याशी आहे, असा संशय निर्माण झाला. अशातच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.









