मुंबई हादरली, आधी बिर्याणी अन् झोपताना सर्वांनी कलिंगड खाल्लं, सकाळी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, काय घडलं?

मुंबई तक

Mumbai Food Poisoning News : एका कुटुंबातील चौघांचा फूड पॉइझनिंगमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची नोंद पोलिसांत झाली असून पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

ADVERTISEMENT

picture Mumbai Food Poisoning News
picture Mumbai Food Poisoning News
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई हादरली, आधी बिर्याणी अन् झोपताना सर्वांनी कलिंगड खाल्लं

point

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Mumbai Food Poisoning News, मुंबई : नातेवाईकांसोबत सर्वांनी जेवण केलं अन् त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाऊन झोपी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. विषबाधेमुळे या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मृतांमध्ये 40 वर्षीय पती, 35 वर्षीय पत्नी, 16 वर्षांची मुलगी आणि 13 वर्षांची धाकटी मुलगी यांचा समावेश आहे. या कुटुंबाने 25 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10.30 वाजता या इतर पाच नातेवाईकांसोबत एकत्रित जेवण केले होते. जेवणानंतर इतर नातेवाईक आपल्या घरी परतले. त्यानंतर मध्यरात्री साधारण 1 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान या चौघांनी कलिंगड खाल्ले होते.

हेही वाचा : मेट्रो स्टेशनच्या वॉशरुममधून दुर्गंधी येऊ लागली, अखेर पोलिसांनी दरवाजा उघडला, समोरील दृश्य पाहून सर्वांची झोप उडाली

पहाटे प्रकृती बिघडली, उपचारादरम्यान मृत्यू

दरम्यान, हे कुटुंब पायधुनी परिसरात पायधुनी परिसरातील राहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री बिर्याणी आणि मध्यरात्री कलिंग खाऊन झोपल्यानंतर आज पहाटे 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यानंतर त्यांना प्रथम कुटुंबीय डॉक्टरांकडे दाखवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान धाकट्या मुलीचा सकाळी 10.15 वाजता मृत्यू झाला, तर पतीचा रात्री 10.30 वाजता मृत्यू झाला. इतर सदस्यांचाही मृत्यू याच दरम्यान झाला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले असून मृत्यूचे नेमकं कारण काय? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत. या प्रकरणी जेजे मार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हे वाचलं का?