उद्धव ठाकरेंनी भर सभेत 'मुंबई Tak' चा व्हिडीओ दाखवला, म्हणाले,"आईची शपथ घेऊन गद्दारी"

मुंबई तक

Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये सभा घेत खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. ते नेमंक काय म्हणाले? जाणून घेऊयात..

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh
Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी भर सभेत 'मुंबई Tak' चा व्हिडीओ दाखवला

point

म्हणाले,"आईची शपथ घेऊन गद्दारी"

Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh, यवतमाळ : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरु केलाय. पहिल्यांदा ते यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. संजय देशमुख यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी 'मुंबई Tak' ला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ भर सभेत दाखवत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात.. 

"आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार, तिला काय वाटत असेल?"

मुंबई Tak चा व्हिडीओ दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असतील. तर खरोखर आईला काय वाटत असेल? चूक आपल्या सगळ्यांची झाली. विशेषत: माझी झाली. याने पूर्वी एकदा आपल्याशी गद्दीरी केली होती. तरी परत आले. एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवर संकट येऊच शकत नाहीत. तू स्वत:ची काळजी कर माझी करु नकोस.", अशा शब्दात ठाकरेंनी संजय देशमुखांवर प्रहार केला. 

'माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा केला होता'

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, झालंय ना..शिवसेना संपली ना? पक्ष चोरला, चिन्ह चोरला तरी ठाकरे उभा आहे. आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती. तर तुमच्या नाकावर टिच्चून या जनतेने 9 खासदार आपल्या हक्काचे निवडून आणले होते. ते फोडण्याची वेळ का आली? त्यावेळी चिडवलं जात होतं. तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आणले होते. अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा केला होता. त्यांच्या छाताडावर शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींच्या लाट? असा सवालही ठाकरेंनी केला. 

विकास निधी..विकास निधी म्हणून बोंबलत आहेत. गेल्या दोन वर्षात किती वेळा हे खासदार हजर होते. आंदोलन म्हणून त्यांनी काय केलं का? प्रत्येक जण म्हणतो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मग मुलगा आहेस तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग. कशाला त्यांच्याशी का गद्दारी करतोय? मी कर्जमाफी केली होती, ती मिळाली होती की नाही? तुम्हीच सांगा. आता कर्जमाफीतून फसवणूक केली जाते. 

हे वाचलं का?