“...तर सेवेचा राजीनामा द्या आणि”, राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सुनावलं
Raj Thackeray on Vishwas Nangare Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विश्वास नांगरे पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
“...तर सेवेचा राजीनामा द्या आणि”,
राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सुनावलं
Raj Thackeray on Vishwas Nangare Patil, मुंबई : काही दिवसांपूर्वीच नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात सहभाग घेत RSS चे कौतुक केले. यावरुन मोठा राजकीय वाद सुरु झालाय. विश्वास नांगरे पाटील यांनी RSS चे कौतुक केल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना चांगलंच सुनावलं. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना सद्सद्विवेक वापरण्याचा सल्ला दिलाय. नांगरे पाटील काय म्हणाले होते? राज ठाकरे आणि काँग्रेसने त्यांच्यावर कोणत्या शब्दात टीका केलीये? जाणून घेऊयात..
हेही वाचा : गर्लफ्रेंडच्या भावाला बॉयफ्रेंडने 40 अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले, सकाळी दोघांची बॉडी सापडली
विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले होते?
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ... 1925 मध्ये एका दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी या संघटनेचा पाया रचला. गेल्यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली, याच निमित्ताने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे त्रिपाठीजी आणि हंसाजी यांनी अगदी शुद्ध हिंदीत भाषण केले, माझी हिंदी मात्र तोडकीमोडकी हिंदी आहे.", असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले होते.
दरम्यान, या नांगरे पाटलांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने तो एक्सवर शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली."शासकीय सेवेत असताना अशाप्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले", अशा शब्दात काँग्रेसने नांगरे पाटलांबाबत भाष्य केलं होतं.









