नवरदेवाचा गॉगल घालायला नकार, भर वरातीत मामाने कुणाची केली हत्या?

मुंबई तक

गॉगल घालण्यावरून झालेल्या वादात एका 27 वर्षीय तरुणाला आपली जीव गमवावा लागला. लग्नाच्या आनंदी वातावरणातच अशी ह्रदयद्रावक टाकणारी घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवरदेवाचा गॉगल घालायला नकार,

point

भर वरातीत मामाने कुणाची केली हत्या?

Crime News : झारखंडमधील गढवा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नातील एका क्षुल्लक वादाचे रूपांतर हत्येत झाले. धुरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनडीहा गावात गॉगल घालण्यावरून झालेल्या वादात एका 27 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. लग्नाच्या आनंदी वातावरणातच अशी मन हेलावून टाकणारी घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवऱ्याला गॉगल घालण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल रोजी सोनडीहा येथील धर्मन यादव यांच्या घरून  रारो नावाच्या गावातील लक्ष्मण यादव यांच्याकडे वरात गेली होती. लग्नविधी सुरू असताना नवरदेवाभोवती मित्र आणि नातेवाईकांची गर्दी होती. यावेळी नवरदेवाचा मामा रवींद्र यादव याने नवरदेवाला जबरदस्तीने गॉगल घालण्याचा प्रयत्न केला, परंतु नवरदेवाने त्याला वारंवार नकार दिला.

हे ही वाचा : कधीकाळी 32 मतांनी निवडणूक जिंकून आमदार झाले, भाजपने विधानपरिषदेची संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत?

त्याच्यावर जबरदस्ती का करता?

याच गोष्टीवरून तिथे उपस्थित असलेल्या मुकेश यादव नावाच्या तरुणाने हस्तक्षेप केला. 'नवरदेव गॉगल घालायला नकार देत असेल तर त्याच्यावर जबरदस्ती का करता?' असा साधा प्रश्न मुकेशने विचारला. यावरून रवींद्र आणि मुकेश यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. सुरुवातीला उपस्थितांनी हा वाद शांत केला, मात्र थोड्या वेळाने मुकेशला एकटे पाहून रवींद्रने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली.

हे ही वाचा : पुण्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 16 राऊंड फायर केल्याने देहुरोड परिसरात दहशतीचं वातावरण

आनंदाच्या वातावरणावर विरजण

या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. ग्रामस्थांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वरातीत एकच खळबळ उडाली आणि आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले. मुकेशचा मृतदेह गावी पोहोचताच कुटुंबाने रवींद्र यादव विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
 

हे वाचलं का?